Navratri 2022: नवरात्रीच्या नवव्या दिवशी करा माता सिद्धिदात्रीची पूजा, होईल कार्यसिद्धी
आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी देवी सिध्दिदात्रीची उपासना करतात. जाणून हेवूया या दिवसाचे महत्त्व .
मुंबई, नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा मताच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते, त्यात महाअष्टमी आणि महानवमीला विशेष महत्त्व आहे. महानवमीला नवरात्रीची सांगता होते. नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. सिद्धिदात्री हे दुर्गेचे नववे रूप मानले जाते. या दिवशी कन्यापूजाही केली जाते. या दिवशी हवन आणि पूजेच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त रात्री नवरात्रोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की नवमीच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची विशेष पूजा केल्याने अनेक सिद्धी प्राप्त होतात. सिद्धी प्राप्त करण्यासाठी महादेवाने देखील देवी सिद्धिदात्रीची विशेष पूजा केल्याची धार्मिक मान्यता आहे. देवी सिद्धिदात्रीची पूजेची पद्धत आणि कार्यसिद्धीचा मंत्र जाणून घेऊया.
देवी सिद्धिदात्रीची उपासना पद्धत
ज्योतिषांच्या मते ज्याप्रमाणे भगवान शिवाने देवी सिद्धिदात्रीची तपश्चर्या करून आठ सिद्धी प्राप्त केल्या होत्या, त्याचप्रमाणे विधिपूर्वक मातेची पूजा आणि मंत्रजप केल्याने भक्ताला बुद्धी प्राप्त होते, तसेच कार्यसिद्ध होते.
देवी सिद्धिदात्रीची पूजा करण्यासाठी सर्व प्रथम पहाटे लवकर उठून स्नान करावे. चांगले वस्त्र परिधान करून मातेच्या पूजेचे ठिकाण तयार करावे. देवी सिद्धिदात्रीची मूर्ती चौकीवर स्थापन करून ध्यान करावे.देवीला प्रसाद अर्पण करावा. फळे, फुले इत्यादी देवीला अर्पण करावे. ज्योत प्रज्वलित करून सिद्धिदात्री मातेची आरती करा. शेवटी देवीचा आशीर्वाद घेऊन पूजेची सांगता करावी.
मंत्र
‘ॐ सिद्धिदात्र्यै नम:।’
इस मंत्र को पूजा, हवन, कन्या पूजन के समय जपा जाता है. इससे देवी अत्यंत प्रसन्न होती हैं और सभी मनोकामनाएं पूर्ण करती हैं।
‘विद्या: समस्तास्तव देवि भेदा: स्त्रिय: समस्ता: सकला जगत्सु। त्वयैकया पूरितमम्बयैतत् का ते स्तुति: स्तव्यपरा परोक्ति:।।’
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)