जगभरातल्या राजकारण्यांमध्ये कुणाचा किती प्रभाव? पंतप्रधान मोदी कितव्या क्रमांकावर? वाचा स्पेशल रिपोर्ट
17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र मोदी आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, या निमित्ताने जाणून घेऊया, नरेंद्र मोदी विरुद्ध जगातील 5 बड्या नेत्यांचे पसंतीच्या दृष्टीने कितवे स्थान आहे.
उत्कृष्ट वक्ता, प्रभावी नेतृत्व, दूरदृष्टी, सुयोग्य नियोजक आणि टेक्नॉलॉजीशी उपडेट या गुणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत (Worlds Populous Leader) प्रथम स्थानावर आले. मॉर्निंग कन्सल्टच्या ताज्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी (Narendra Modi) 75 टक्के गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत, तर जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Jo Biden) 43 टक्के गुणांसह आठव्या स्थानावर आहेत. जागतिक स्तरावर पंतप्रधान मोदींचे हे यश केवळ त्यांचेच नव्हे तर भारताचेही प्रतिनिधित्व करते. जगातील आघाडीच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी आणि भारताच्या लोकप्रियतेचा आलेख वर्षानुवर्षे चढत्या क्रमानेच राहिला आहे. 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र मोदी आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. चला, या निमित्ताने जाणून घेऊया, नरेंद्र मोदी विरुद्ध जगातील 5 बड्या नेत्यांचे पसंतीच्या दृष्टीने कितवे स्थान आहे.
शिक्षणापासून राजकारणाच्या आखाड्यापर्यंत इतका अनुभवी कोण?
जर पंतप्रधान मोदींची जगातील 5 प्रमुख नेत्यांशी तुलना केली तर रशियाचे सर्वात शिक्षित राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात पीएचडी केली आहे. पीएम मोदींनी राज्यशास्त्रात एमए केले आहे. डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतिन आणि बराक ओबामा यांनी अर्थशास्त्रात अभ्यास केला आहे. जो बिडेन हे कायदा आणि शी जिनपिंग अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे आहेत.
कोण आहे सोशल मीडियावर लोकप्रिय?
सोशल मीडियाच्या युगात, जागतिक स्तरावर लोकप्रियतेची चाचणी घेण्यात ट्विटर हे एका मानकापेक्षा कमी नाही. ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येबाबत बोलायचे झाले तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 133.1 दशलक्ष फॉलोअर्ससह आघाडीवर आहेत. ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत बराक ओबामा पहिल्या क्रमांकावर आहेत. दिग्गज नेत्यांशी तुलना केली तर नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ट्विटरवर त्यांचे 824 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, जो बिडेनच्या अकाउंटला 3.56 दशलक्ष फॉलोअर्सची नोंद आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे, तथापि, जुलै 2021 पर्यंत त्यांचे 8.87 दशलक्ष फॉलोअर्स होते. त्याच वेळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे ट्विटरवर अधिकृत खाते नाही.
दिग्गजांचा राजकीय प्रवास
जगातील या दिग्गजांची तुलना केल्यास एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे त्यांचा संघर्ष. सामान्य माणूस ते जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व बनण्याचा प्रवास कुणाचाच प्रवास सोपा नव्हता. काहींनी चहाच्या टपरीपासून तर काहींनी शेती करत इतिहास घडवण्याच्या प्रवासाला सुरुवात केली. जाणून घ्या, कसा होता दिग्गजांच्या जीवनाचा प्रवास..
पंतप्रधान नरेंद्र मोदी: चहाच्या टपरीपासून ते राजकारणाच्या शिखरापर्यंत
नरेंद्र दामोदरदास मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. लहानपणी वडिलांची त्यानंतर स्वतःची चहाची टपरी चालवायचे. वयाच्या आठव्या वर्षी RSS मध्ये प्रवेश केला. पदवीनंतर घर सोडले आणि दोन वर्ष भारत भ्रमण गेले. धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. 1970 मध्ये ते गुजरातमध्ये परतले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ नेते बनले. भाजपचे दिग्गज नेते अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1995 मध्ये त्यांना देशातील पाच राज्यांमध्ये संघटनेशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्याच्या आधारावर 1998 मध्ये प्रमोशन करून राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) पद दिले. आणीबाणीच्या काळात सक्रिय भूमिका बजावली. २००१ मध्ये गुजरातच्या भूकंपात तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आले होते. ते सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2014 मध्ये पंतप्रधान झाले. टाईम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर 2013 च्या 42 उमेदवारांच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश केला आहे.
बराक ओबामा: वांशिक टिप्पण्यांचा सामना केला आणि अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष बनले
बराक हुसेन ओबामा यांचे वडील बराक ओबामा सीनियर हे आफ्रिकेतील मुस्लिम नागरिक होते. शेळ्या -मेंढ्या चरायला नेऊन ते उदरनिर्वाह करत असे. त्यानंतर ते अमेरिकेत आले आणि एका गोर्या ख्रिश्चन अमेरिकन मुलीला भेटला. त्या दोघांचे लग्न झाले. ओबामा यांचा जन्म 4 ऑगस्ट 1961 रोजी होनोलुलु येथे झाला. 3 वर्षानंतर आई-वडील वेगळे झाले. बराक वर्णभेदाला सामोरे जावे लागले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी लॉस एंजेलिसच्या कॉलेजमधून राज्यशास्त्राचा अभ्यास केला. हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायदेशीर संस्थेत काम करण्यास सुरुवात केली. येथे मिशेल रॉबिन्सन भेटले आणि बाराक त्यांच्या प्रेमात पडले. दोघांनी 3 ऑक्टोबर 1992 रोजी लग्न केले आणि केनवुडला स्थलांतरित झाले.
ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे पुस्तक त्यांनी लिहिले. त्यावर बरीच चर्चा झाली. लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये स्टेट सिनेटरची निवडणूक लढवली आणि जिंकली. नंतर 2004 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बराक यांची लोकप्रियता पाहून डेमोक्रॅटिक पक्षाने 2008 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निवडला. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जॉन मॅककेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आणि अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष होण्याचा विक्रम केला. 2012 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकली. 2009 मध्ये त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
जो बायडेन: सर्वात तरुण सिनेटर ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर अध्यक्ष
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ रॉबिनेट बायडेन यांच्या नावावरही दोन मोठे विक्रम आहेत. पहिला, अमेरिकेचा सर्वात तरुण सिनेटर आणि दुसरा तिथले सर्वात वयस्कर अध्यक्ष. पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय असलेल्या बायडेनचा जन्म 1942 मध्ये पेनसिल्व्हेनियामधील स्क्रॅंट येथे झाला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वकील म्हणून काम केले.
बायडेन यांना वैयक्तिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागला. पत्नी नीलिया आणि मुलगी नाओमी यांचा कार अपघातात मृत्यू झाला. मुलगा हंटर आणि ब्यू गंभीर जखमी झाले. मुलांचे संगोपन सिंगल फादर म्हणून केले. मुलगा ब्यूचा कर्करोगाने मृत्यू झाला. अपघातानंतर 5 वर्षांनी बायडेनने जिलशी पुन्हा लग्न केले. 1972 मध्ये सर्वात तरुण सिनेटर बनले. यानंतर ते 6 वेळा सिनेटर होते. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर 2008 मध्ये त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. 1988 आणि 2008 मध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत पराभूत झाल्यानंतर अखेरीस ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्यात यशस्वी झाले.
डोनाल्ड ट्रम्प: विद्यार्थी नेता ते लेखक, कलाकार आणि अध्यक्ष असा होता प्रवास
14 जून 1946 रोजी न्यूयॉर्क शहरात जन्मलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे वडील फ्रेडरिक ट्रम्प आणि आई मेरी ॲन ख्रिश्चन होते. वडील बांधकाम व्यावसायिक आणि रिअल इस्टेट व्यापारी होते. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण न्यूयॉर्कमधून केले. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना लष्करी शाळेत पाठवण्यात आले. उच्च शिक्षणासाठी ते फोडर्म विद्यापीठ आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात गेले. येथे फायनान्समध्ये पदवी घेतली. 1964 मध्ये त्यांच्या अभ्यासादरम्यान, ते स्टार ॲथलीट बनले आणि विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी ठसा उमटवला. 5 भावंडांपैकी एक असलेल्या ट्रम्प यांनी तीन विवाह केले. तिघीही मॉडेल आणि अभिनेत्री आहेत. कॉलेजच्या काळापासूनच त्यांनी वडिलांच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ठसा उमटवला.
आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा कधीही कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंध नव्हता. 16 जून 2015 रोजी त्यांनी जाहीर केले की, त्यांना रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे तिकीट मिळेल. ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महागडा सोहळा ठरला आहे. यामध्ये सुमारे 1300 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
शी जिनपिंग: गावातील गुहांमध्ये राहिले, शेती केली आणि दहाव्या प्रयत्नात राजकीय पक्षात प्रवेश केला.
शी जिनपिंग हे स्वतंत्र चीनमध्ये जन्मलेले चीनचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. वडील शी जोनसुंग हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य माओ यांच्या जवळचे होते. शी जिनपिंग यांचा जन्म चीनमधील एका संपन्न कुटुंबात झाला. त्यांनी आयव्ही लीगच्या उच्चभ्रू शाळेत शिक्षण घेतले. सर्व काही व्यवस्थित चालले होते. जेव्हा ते 9 नऊ वर्षाचे असताना कादंबरीचे समर्थन केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर सर्व काही बदलले. आईने बळजबरी केली. बहिणींना जबरदस्तीने मार्क्सवादी शिक्षणासाठी पाठवले. शीच्या मोठ्या बहिणीला हे सहन होत नव्हते आणि तिने आत्महत्या केली. शी यांना गावात पाठवण्यात आले. तिथे ते शेती करायचे आणि गुहेत राहायचे.
हा तो काळ होता जेव्हा शी जिनपिंग यांनी परिवर्तन घडवून आणण्याची शपथ घेतली. गावात शेती करत असताना त्यांनी राजकीय पक्षात जाण्यासाठी 9 वेळा अर्ज केला, पण अपयश आले. दहावीत यश मिळाले. त्यांच्या खास शैलीमुळे ते कम्युनिस्ट पक्षात लोकप्रिय झाले. 2013 मध्ये त्यांना अध्यक्षपदासाठी एकतर्फी मते मिळाली होती. 2016 मध्ये पक्षाचे प्रमुख नेते म्हणून घोषित करण्यात आले. 2018 मध्ये एक मोठा निर्णय घेत, शी यांनी त्यांच्यासाठी आजीवन अध्यक्ष राहण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी घटनेत दुरुस्ती केली.
व्लादिमीर पुतिन: जिथे दोनदा राष्ट्राध्यक्ष होण्याची परंपरा आहे, तिथे 4 वेळा हे पद भूषवले
7 ऑक्टोबर 1952 रोजी जन्मलेल्या पुतिन यांचे पूर्ण नाव व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन आहे. पुतीनचा जन्म लेनिनग्राडमधील अशा परिस्थितीत झाला होता जिथे गृहयुद्ध सुरु होते. या परिस्थितीमुळे पुतिन यांना ज्युडो शिकण्यास भाग पाडले. क्रेमलिनच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पुतिन यांना शाळेत असतानाच सोव्हिएत युनियनमध्ये गुप्तहेर म्हणून सामील व्हायचे होते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 2015 मध्ये पुतिन म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी मी लेनिनग्राड (आता सेंट पीटर्सबर्ग) च्या रस्त्यांवरून सैन्य प्रशिक्षणाचे धडे घेतले होते.