पिंपरी चिंचवड: राज्यातील राजकीय नाट्यानंतर आता (Local self-government) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. निवडणुक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुक कार्यक्रम तर जाहीर केला आहेच पण ( Municipal Corporation Elections) महापालिका निवडणुका देखील आता येऊन ठेपल्या आहेत. 2017 च्या निडणुकीत प्रभाग क्रमांक 21 मध्ये (NCP) राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली होती. पण त्यानंतर आता राजकीय स्थितीमध्ये मोठा बदल झाला असून यंदा काय होणार याकडे लक्ष लागले आहे. या प्रभागातील तीन वार्डामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आणि उरलेल्या एका वॉर्डात भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. यात राष्ट्रवादीच्या कदम निकता अर्जुन, वाघेरे उषा संजोग, आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम यांचा सहभाग होता. भाजपच्या वाघेरे संदीप बाळकृष्ण यांचा सहभाग होता.
प्रभाग क्रमांक 21 – मिलींदनगर, संजय गांधीनगर,पिंपरी गाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलनी
2017 च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार
- अ – राष्ट्रवादी – कदम निकता अर्जुन
- ब – भाजप – वाघेरे संदीप बाळकृष्ण
- क – राष्ट्रवादी – वाघेरे उषा संजोग
- ड – राष्ट्रवादी – आसवाणी हिरानंद उर्फ डब्बू किमतराम
प्रभाग कुठून कुठपर्यंत?
- व्याप्ती: आकुर्डी गावठाण, गंगानगर, दत्तवाडी, लोकमान्य हॉस्पिटल परिसर इ.
- उत्तर: अरुणकुमार रणधीर मार्गापासून पुर्वेस मनपा नर्सरी व लोकमान्य हॉस्पिटल मागच्या रस्त्याने गायत्री ग्रेस पर्यंत व तेथून दक्षिणेस रस्त्याने सेंट्रल बँकेपर्यंत व रस्त्याने पुर्वेस निगडी फ्लाय ओव्हर टिळक चौकापर्यंत.
- पूर्व: टिळक चौकातून पुणे मुंबई रस्त्याने दक्षिणेस फकिरभाई पानसरे मनपा शाळा आकुर्डीपर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस शितळा देवी चौकातून म्हाळसाकांत कॉलेजच्या रस्त्याने आकुर्डी हॉस्पिटल नाल्यापर्यंत व तेथून दक्षिणेस पांढारकर वस्ती मनपाचे मलशुध्दीकरण केंद्रा लगतच्या नाल्याने व गंगानगर रस्ता नाल्याने रेल्वे लाईन पर्यंत.
- दक्षिण: रेल्वे लाईन.
- पश्चिम: रेल्वे लाईन वरुन उत्तरेस स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने म्हाळसाकांत चौक व विसावा चौक ओलांडून सावरकर सावरकर चौकापर्यंत (टिळक रोड) व टिळक रस्त्याने पश्चिमेकडे निगडी रोप वाटीका लगतच्या रस्त्यापर्यंत व तेथून उत्तरेस अरुणकुमार रणधीर रस्त्यापर्यंत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 21 वॉर्ड अ
पक्ष | उमेदवराचे नाव | विजयी/ आघाडी |
राष्ट्रवादी काँग्रेस | | |
भाजप | | |
काँग्रेस | | |
शिवसेना | | |
मनसे | | |
इतर अपक्ष | | |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 21 वॉर्ड ब
पक्ष | उमेदवराचे नाव | विजयी/ आघाडी |
राष्ट्रवादी काँग्रेस | | |
भाजप | | |
काँग्रेस | | |
शिवसेना | | |
मनसे | | |
इतर अपक्ष | | |
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग 21 वॉर्ड क
पक्ष | उमेदवराचे नाव | विजयी/ आघाडी |
राष्ट्रवादी काँग्रेस | | |
भाजप | | |
काँग्रेस | | |
शिवसेना | | |
मनसे | | |
इतर अपक्ष | | |
प्रभाग क्रमांक 21 आरक्षण
- 21 अ सर्वसाधारण – महिला
- 21 ब सर्वसाधारण- महिला
- 21 क सर्वसाधारण
प्रभाग लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या ४००८५
- अ. जा.- 2843
- अ.ज.- 279