अकोला: भाजप आणि शिंदे गट एकत्र आला असलातरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनच्या मविआ (Mahavikas Aghadi) पॅटर्नमुळेही चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा अकोला महानगरपालिकेवर आता कोणाचा झेंडा फडकविणार यावर अकोलावाशियांचे लक्ष लागून आहे. अकोला महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांचे (Election 2022) पडघम वाजू लागले असतानाच त्याचे पडसाद आता राज्यातील अकोला महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 10 मध्येही जाणवू लागले आहे. यामुळे राज्यातील राजकारणज्या प्रमाणे ढवळून निघाले त्याच प्रमाणे प्रभाग क्र. 10 मध्येही राजकारण ढवळून निघाले आहे. सत्तासंघर्षाचे नाट्य सुरु असतानाच महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीची आरक्षण सोडतही जाहीर झाली. त्यामुळे राजकीय पक्षांसह अनेक नेत्यांना आरक्षण सोडतीचा धक्का बसला आहे. अकोला महानगरपालिकेत (Akola Municipal Corporation) मागील वर्षी 80 सदस्यांसाठी 20 प्रभागामध्ये निवडणूक झाली होती, मात्र आता होणारी निवडणुकांमध्ये प्रभाग वाढले असून आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेतील अनेक लोकप्रतिनिधींना धक्का बसला आहे. यासगळ्यात प्रभाग 10 चा मतदार राजा कुणाला कौल देणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
2017 सार्वत्रिक महापालिका निवडणूक विजयी उमेदवार प्रभाग क्रमांक 10
- प्रभाग क्रमांक 10 अ- अनिल गरड (भाजप)
- प्रभाग क्रमांक 10 ब- मंजुषा शेळके (शिवसेना)
- प्रभाग क्रमांक 10 क- वैशाली शेळके (राष्ट्रवादी)
- प्रभाग क्रमांक 10 ड- सतीश ढगे (एमआयएम)
अकोला प्रभाग क्रमांक 10 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
भाजप | | |
शिवसेना | | |
राष्ट्रवादी | | |
काँग्रेस | | |
मनसे | | |
अपक्ष | | |
अकोला प्रभाग क्रमांक 10 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
भाजप | | |
शिवसेना | | |
राष्ट्रवादी | | |
काँग्रेस | | |
मनसे | | |
अपक्ष | | |
अकोला प्रभाग क्रमांक 10 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
भाजप | | |
शिवसेना | | |
राष्ट्रवादी | | |
काँग्रेस | | |
मनसे | | |
अपक्ष | | |
प्रभाग क्रमांक 10 लोकसंख्या
- एकूण लोकसंख्या- १९,४२१
- अनुसूचित जाती- ५९४४
- अनुसूचित जमाती- ४५५
प्रभाग क्रमांक 10 आरक्षण
- प्रभाग क्रमांक 10 अ- अनुसूचित जाती (महिला)
- प्रभाग क्रमांक 10 ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
- प्रभाग क्रमांक 10 क- सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 10 महत्त्वाची ठिकाणं
- स्थळ- तारफेल, मोहता मिल चाळ, उत्तमचंद प्लॉट, विजय नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, माळी पुरा, जंगम मठ, गवळी पुरा, मणकर्णी प्लॉट, जाम मोहल्ला फिरदोस कॉलनीचा काही भाग.
- उत्तर- मोर्णा नदी व मुंबई, कलकत्ता रेल्वेलाईन यांचे संगमापासून पुर्वेस मुंबई कलकत्ता रेल्वेलाईनने देशमुख फैल मधील कृषी उत्पन्बाजार समिती कडून येणारा रस्ता व मुंबई कलकत्ता रेल्वेलाईन चे संगमापर्यंत.
- पूर्व- मुंबई कलकत्ता रेल्वेलाईन व देशमुख फैलाचे दूर्गा चौकाकडून येणारा रस्ता यांच्या संगमापासून दक्षिणेकडे रस्त्याने संतोष पारोचे यांच्या घरापर्यंत पूढे पश्चिमेकडील प्रकाश घोगलिया यांच्या घरापर्यंत पूढे दक्षिणेकडील रस्त्याने वाल्मिकी आंबेडकर सभागृहापर्यंत पुढे पूर्व कडे रस्त्याने सिध्दार्थ मानवता हॉल पर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे रस्त्याने बादशाह खान चौकापर्यंत तेथुन पुढे पुर्वेकडे रस्त्याने अॅड. गिरीष चांडक यांच्या घरापर्यंत तेथून पुढे दक्षिणेकडे रस्त्याने अकोट स्टॅन्ड चौक ओलांडून आर. बी. इन्सुलेटरस दुकानापर्यंत.
- दक्षिण-टिळक रोडवरील आर वी इन्सुलेटरस दुकानापासून पश्चिमेकडे रस्त्याने माळीपुरा चौकातून लक्कडगंज रस्त्याने अकोला फर्निचर पर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने गुलाम रसूल यांचे घरापर्यंत तेथून पुढे रस्त्याने पश्चिमेस अब्दुल सलीम अब्दुल रहेमान यांचे घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेस रस्त्याने एकबाल उस्मान कासमानी यांचे घरासमोरील नाल्यापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस नाल्याने वहीद खान अय्युब खान यांचे घरापर्यंत तेथून पुढे उत्तरेस नासीर खान यांचे घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस तपे हनुमान मंदिराकडे जाणा-या रस्त्याने सरळ मोर्णा नदीपर्यंत.
- पश्चिम- तपे हनुमान मंदिराकडून येणारा रस्ता व मोर्णा नदीचे संगमापासून उत्तरेकडे मोर्णा नदीचे तिराने मुंबई कलकत्ता रेल्वेलाईनचे संगमापर्यंत.