TMC Election 2022, Ward 47 : नव्याने बनलेल्या प्रभाग 47 मध्ये शिवसेनेची सत्ता कायम राहतेय कि भाजपचे कमळ फुलतेय? जाणून घ्या सध्याची स्थिती

नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार पालिकेच्या 47 पैकी 24 प्रभागांमध्ये महिलांचा वरचष्मा दिसणार आहे. पालिकेचे पूर्वी 33 प्रभाग होते, ते आता वाढून एकूण 47 झाले आहेत. यावर्षीची निवडणूक तीन पॅनल पद्धतीने होणार आहे.

TMC Election 2022, Ward 47 : नव्याने बनलेल्या प्रभाग 47 मध्ये शिवसेनेची सत्ता कायम राहतेय कि भाजपचे कमळ फुलतेय? जाणून घ्या सध्याची स्थिती
ठाणे महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 6:05 AM

ठाणे : मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यात यंदा महापालिका निवडणुकांची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ताबदल झाला आहे. त्यातच काही महिन्यांवर पालिका निवडणुका (Municipal Election) होत आहेत. ठाणे महापालिकेचे मागील अर्थात 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 33 प्रभाग होते. त्या प्रभागांची संख्या आता वाढून 47 झाली आहे. यापैकी 47 क्रमांकचा प्रभाग हा शेवटचा प्रभाग ठरला आहे. हा प्रभाग शीळ बायपास या नावाने ओळखला जात आहे. या प्रभागामध्ये संमिश्र स्वरूपाची लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या नेमक्या कोणत्या पक्षाला आपला कौल देऊन प्रभागातील विकासकामांना चालना देऊ पाहतेय हे नजीकच्याच काळात स्पष्ट होणार आहे. नव्याने बनलेल्या या प्रभागामध्ये शिवसेना (Shivsena) आपली सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावतोय की एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याच्या जोरावर भाजप आपले कमळ फुलवण्यात यश मिळवतोय, हे पाहणे रंजक ठरणार आहे. चला तर याठिकाणी या प्रभागातील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याचा थोडक्यात आढावा घेऊ.

ठाणे महापालिका वॉर्ड 47 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 47 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 36697 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 261 अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकसंख्या – 309

हे सुद्धा वाचा

प्रभागामध्ये कोणत्या विभागांचा समावेश ?

प्रभाग क्रमांक 47 हा तुलनेत आकाराने लहान असलेला नवा प्रभाग आहे. नव्या प्रभाग रचनेमध्ये वेगवेगळ्या प्रभागांमधील काही भागांचा समावेश करून हा नवीन प्रभाग तयार करण्यात आला आहे. या प्रभागामध्ये शीळ, डायघर आणि कौसा या तीन प्रमुख परिसरांतील काही विभागांचा समावेश होतो.

ठाणे महापालिका वॉर्ड 47 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरचे महापालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना – 67 राष्ट्रवादी – 34 भाजप – 23 काँग्रेस – 3 एमआयएम – 2 अपक्ष – 2

ठाणे महापालिका वॉर्ड 47 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार पालिकेच्या 47 पैकी 24 प्रभागांमध्ये महिलांचा वरचष्मा दिसणार आहे. पालिकेचे पूर्वी 33 प्रभाग होते, ते आता वाढून एकूण 47 झाले आहेत. यावर्षीची निवडणूक तीन पॅनल पद्धतीने होणार आहे. यापैकी 24 प्रभागांमध्ये दोन महिला उमेदवारांचे वर्चस्व असणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता प्रभाग क्रमांक 47 ची निवडणूक देखील इतर प्रभागांप्रमाणेच तितकीच चुरशीची होणार आहे. केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी किंगमेकर ठरलेल्या भाजपने नव्या प्रभागांमध्ये आधीच आपली जोरदार ताकद लावायला सुरुवात केली आहे. ठाण्याच्या पालिका निवडणुकीत आपली सत्ता मिळण्यासाठी आणि विद्यमान सत्ताधारी भाजपाला धोबीपछाड देण्यासाठी भाजप शर्थीचे प्रयत्न करेल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 47 ची निवडणूक देखील चुरशीची होणार हे निश्चित.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.