PCMC election 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग19 मध्ये भाजप आपले स्थान टिकवून ठेवणार का?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र राज्यातील बदलत्या सत्तांतराचा फायदा घेत भाजप पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली एकहाती सत्ता टिकवून ठेवण्यासाठी टोकाचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation)आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखले जाते , आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सज्ज झालेली आहे. उद्योगनगरी म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या या शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकितीही अटीतटीची लढत पहायला मिळणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेत झालेले बदल याचा मोठा परिणाम आगामी निवडणुकीवरती दिसून येणार आहे. मागील महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक सदस्य प्रभाग रचना होती. मात्र नव्या प्रभाग रचनेमध्ये एका प्रभागात तीन सदस्य अशी त्रिसदस्यीय रचना झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अनेक माजी नगरसेवकांकडून आपले स्थान टिकून ठेवण्यासाठी पक्षांतराचे भूमिका ही घेतली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी (NCP)आणि भाजप यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र राज्यातील बदलत्या सत्तांतराचा फायदा घेत भाजप पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीनिशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar)हे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेली एकहाती सत्ता टिकवून ठेवण्यासाठी टोकाचे प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
नगरसेवकांचेही प्रयत्न पणाला
या महानगरपालिकेवरील वर्चस्व हे राज्यातील राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. गेल्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत अत्यंत कमी मताने राष्ट्रवादीने बाजी मारत महापालिकेवर आपली सत्ता स्थापन केली होती. या वेळच्या निवडणुकीमध्ये एका प्रभागात अ ब क असे झालेले तीन विभाग यामुळे उमेदवारांचे एकूण तीन पॅनल असलेले पाहायला मिळणार आहेत. याचा परिणाम निवडणुकीवरती निश्चित पद्धतीने होणार आहे. तसेच नव्या प्रभाग रचनेमुळे गेल्या अनेक काळापासून नगरसेवकांचा हातखंडा असलेल्य वार्डचे विभाजन झाल्याने विद्यमान नगरसेवकांचेही प्रयत्न पणाला लागणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 ची लोकसंख्या
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण लोकसंख्या 33 हजार 916 एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची ;लोकसंख्या 11हजार 571 इतकी आहे तर अनुसूचित जमातीचे लोकसंख्या 297 आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
या परिसरांचा समावेश
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये चिंचवड स्टेशन दत्तनगर, मोहन नगर, इंदिरानगर, आनंद नगर, एमआयडीसी कार्यालय ,या परिसरांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
2017 चा निकालकाय सांगतो
गेल्या निवडणुकीत या प्रगातून भाजपचे सर्वउमेदवार निवडणून आले होते. यामध्ये शैलेंद्र मोरे, जयश्री गावडे, कोमल मेवाणी व शितल शिंदे या नगरसेवकांचा समावेश होता. प्रभाग क्रमांक 19 हा विजय नगर आनंद नगर एम्पायर इस्टेट भटनगर पिंपरी कॅम्प म्हणून ओळखला जातो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
आरक्षणाची सोडत कशी?
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 19 मध्ये आरक्षणाचे सोडत मध्ये 19अ अनुसूचित जाती महिला, 19 ब सर्वसाधारण महिला, 19 क सर्वसाधारण अशी आहे.