PCMC Election 2022 Ward 32 : भाजपचा गड अभेद्य राखण्याचा निर्धार; विरोधकांना ‘दे धक्का’ देणार का?
पिंपरी चिंचवड महापालिकेची यंदाची निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. त्यानुसार अलीकडेच या वॉर्डची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.
पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिके (Pimpari-Chinchwad Municipal Corporation)च्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ताधारी भाजप (BJP)सह विरोधकही जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपने सत्ता (Power) कायम राखण्याचा निर्धार केला आहे, तर विरोधकांनी भाजपच्या सत्तेला हादरा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यात कोण बाजी मारते, त्यासाठी कोणकोणत्या व्यूहरचना आखल्या जाताहेत, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत. वॉर्ड क्रमांक 32 हा देखील भाजपच्या सुरक्षेत वॉर्डपैकी एक बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपाला पराभूत करण्याचे मोठे आव्हान विरोधकांपुढे आहे. त्या पार्श्वभूमीवर या वॉर्डातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.
पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर्ड 32 अ
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
वॉर्ड क्रमांक 32 ची लोकसंख्या (काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर)
एकूण लोकसंख्या – 33584 अनुसूचित जाती – 5701 अनुसूचित जमाती – 340
वॉर्डमध्ये नेमक्या कोणकोणत्या विभागांचा समावेश होतो ?
तापकीर नगर, रहाटणी, ज्योतिबा नगर, सांगवी गावठाण, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, जयमालानगर, संगमनगर, पी.डब्ल्यु.डी. कॉलनी, एस.टी.कॉलनी, कृष्णानगर, साईराज रेसिडेन्सी, शिवदत्तनगर, इत्यादी.
पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर्ड 32 ब
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ज्या वॉर्डमधून 100 टक्के बहुमत मिळाले, त्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक 32 चा समावेश राहिला. या वॉर्डमधून निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे सर्वच्या सर्व म्हणजेच चारही उमेदवार निवडून आले होते. त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपसाठी हाही एक आपला बालेकिल्ला ठरला आहे. येथून भाजपचे संतोष कांबळे, शारदा सोनवणे, उषा ढोरे, हर्षल ढोरे हे उमेदवार विजयी झाले होते. त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा हा गड अभेद्य राखण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका वॉर्ड 32 क
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/इतर |
वॉर्ड कोणासाठी राखीव आहे?
पिंपरी चिंचवड महापालिकेची यंदाची निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. त्यानुसार अलीकडेच या वॉर्डची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. वॉर्ड क्रमांक 32 मध्ये महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरून महापालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार या वॉर्डमध्ये अ – अनुसूचित जाती, ब – महिला खुला, क – खुला प्रवर्ग अशा प्रकारचे आरक्षण असेल. भाजपासाठी इथला विजय सोपा मानला जात असला, तरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे विरोधक कशा प्रकारे आव्हान उभे करताहेत, त्यावर भाजपच्या या बालेकिल्ल्याचे भवितव्य अवलंबून असेल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. (maharashtra municipal corporation election pcmc pimpri chinchwad ward 32)