MNREGA : महाघोटाळा उघड! मयतांनी खोदले खड्डे, कोणी खाल्ले टाळूवरचे लोणी

MNREGA : भारतातील महाघोटाळा उघड झाला आहे. देशात अनेक घोटाळे गाजले आहे. त्यात रोजगार हमी योजनेची पुन्हा भर पडली आहे. या योजनेत मयतांनी खड्डे खोदल्याचे उघड झाले आहे. आता कोणी मयताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले याचा तपास सुरु आहे.

MNREGA : महाघोटाळा उघड! मयतांनी खोदले खड्डे, कोणी खाल्ले टाळूवरचे लोणी
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 6:59 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : भारतातील महाघोटाळा उघड झाला आहे. देशात अनेक घोटाळे गाजले आहे. त्यात रोजगार हमी योजनेची पुन्हा भर पडली आहे. यापूर्वी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत घोटाळ्यातील बोगसगिरी समोर आली होती. आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (MNREGA) घाटोळ्याचे प्रकरण गाजत आहे. देशातील अनेक राज्यात हा घोटाळा समोर आला आहे. बोगस जॉब कार्ड तयार करुन दुसऱ्यांनीच मलिदा लाटला. मनरेगामध्ये बोगस जॉब कार्डचा भांडफोड झाला. या घोटाळ्याची व्याप्ती देशभर असल्याचे उघड झाले आहे. केंद्र सरकारने त्याविरोधात कडक कारवाई केली आहे.

5 कोटींहून अधिक जॉब कार्ड रद्द

आर्थिक वर्ष 2021-22 पेक्षा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये बोगस जॉब कार्डधारकांची संख्या 247 टक्के वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला. केंद्र सरकारचेच नाही तर जनतेचे मोठे नुकसान झाले. अशा बनवेगिरीमुळे गरजवंत मनरेगाच्या कामापासून वंचित राहिला. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारने याप्रकरणी गंभीर दखल घेत, 5 कोटींहून अधिक जॉब कार्ड रद्द केले आहेत.

हे सुद्धा वाचा

या राज्यात सर्वात मोठा घोटाळा

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी याविषयीचा खुलासा केला. त्यानुसार मनरेगामध्ये मोठा घोटाळा झाला. मोठ्या संख्येत नकली आणि बोगस जॉब कार्ड तयार करण्यात आल्याचे समोर आले. अनेक लाभार्थी मयत झाले असताना त्यांचे नाव यादीत आहे. तर आता सतर्क झाल्याने केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 च्या यादीतून त्यांची नावे हटवली आहे.

इतकी नावे हटवली

बोगस आणि नकील जॉब कार्डला आळा घालण्यासाठी केंद्राने तडक कारवाई केली. केंद्र सरकारने मयत व्यक्तींची नावे यादीतून वगळली. 2022-23 च्या यादीतून आतापर्यंत 5,18,91,168 इतकी नावे हटविण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात अशा लाभार्थ्यांची संख्या 1,4951247 इतकी होती. पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणातून सर्वाधिक नावे हटविण्यात आली.

आंध्र प्रदेशमधून 78,05,569 मनरेगा कार्ड रद्द

केंद्र सरकारने दिलेल्या आकड्यानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 याकाळात पश्चिम बंगालमध्ये 157309 मनरेगा जॉब कार्ड रद्द केले. यावर्षी ही संख्या वाढून 8336115 इतकी झाली होती. गेल्यावर्षी आंध्र प्रदेशात 625514 जॉब कार्ड होल्डर्सची नावे मनरेगाच्या यादीतून हटवले. यंदा हा आकडा वाढून तो 7805569 इतका वाढला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आंध्र प्रदेश मध्ये 7805569 मनरेगा कार्ड रद्द करण्यात आले.

गुजरात मध्ये 4,30,404 जॉब कार्ड डिलीट

तेलंगाणामध्ये आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 61278 जॉब कार्ड रद्द करण्यात आले. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ही संख्या वाढून 17,32,936 इतकी झाली. तेलंगाणात 1732,936 कार्ड डिलीट करण्यात आले. गुजरात राज्यातही मोठ्या प्रमाणात मनरेगात घोटाळा झाला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1,43,202 मनरेगा जॉब कार्ड रद्द करण्यात आले. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 4,30,404 जॉब कार्ड डिलीट करण्यात आले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.