Virat Kohali Networth : कमाईत विराट कोहली याला पण टाकले मागे, पहिल्या क्रमांकावर ओळखा कोण?

Virat Kohli Networth : विराट कोहलीने कमाईत अनेक दिग्गज, लोकप्रिय खेळाडूंना मागे टाकले आहे. आशियातील तो दुसरा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. पहिल्या स्थानावर हा खेळाडू आहे?

Virat Kohali Networth : कमाईत विराट कोहली याला पण टाकले मागे, पहिल्या क्रमांकावर ओळखा कोण?
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 5:31 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : भारतीय टीमचा आघाडीचा बल्लेबाज, ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो, तो म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) . कोहलीने केवळ मैदानाचं गाजवले नाही तर अनेक क्षेत्रात तो नाव कमावत आहे. त्याचे नाव जगातील सर्वाधिक कमाई (Richest Players) करणाऱ्या टॉप-100 खेळाडूमध्ये झळकले आहे. असा मान मिळवणारे आशियातील केवळ दोनच खेळाडू आहे. या यादीनुसार विराट कोहली आशियातून दुसऱ्या क्रमांकावर आहे. विविध जाहिरात आणि इतर कामातून त्याने गडगंज संपत्ती कमावली (Net Worth) आहे. भारतातूनच नाही तर आशियातील दोन श्रीमंत खेळाडूपैकी तो एक आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोणता खेळाडू आहे? तो कोणत्या देशाचा आहे?

किती आहे संपत्ती

भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे. 2022 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या आघाडीच्या 100 खेळाडूत तो भारताचा एकमेव खेळाडू आहे. त्याची एकूण संपत्ती 1,000 कोटी रुपये आहे. स्पोर्टिको 2022 मध्ये ही यादी तयार केली होती. या यादीत तो 61 व्या क्रमांकावर आहे.

हे सुद्धा वाचा

किती कमाई

भारतीय राष्ट्रीय टीमशिवाय आयपीएल फ्रेंचायीज रॉयल चॅलेंजर्स, बंगळुरुसाठी विराट कोहली खेळतो. या दिग्गज खेळाडूची कमाई 2.9 दशलक्ष डॉलर आणि जाहिरातीतून 31 दशलक्ष डॉलर कमावले आहे. त्यांची एकूण कमाई 33.9 दशलक्ष डॉलर इतकी आहे. कोहली या यादीत घसरला आहे. 2021 मध्ये तो 59 व्या क्रमांकावर होता. आता तो 61 व्या स्थानी आहे.

पहिल्या क्रमांकावर कोण?

विराट कोहली याच्या शिवाय आशियातून आणखी एक खेळाडू आहे. जपानचा टेनिस स्टार नाओमी ओसाका हा पहिल्या क्रमांकावर आहे. 25 वर्षीय नाओमी याने त्याच्या करिअरमध्ये 4 ग्रँड स्लॅम, दोनदा युएएस ओपन आणि दोन ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पिअन जिंकले आहे. ओसाकाचा या यादीत 20 व्या स्थानी आहे. तर आशियातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे.

ओसाकाची कमाई इतकी

टेनिस स्टार नाओमी ओसाका याची एकूण कमाई 53.2 दशलक्ष डॉलर इतकी आहे. त्यात त्याने टेनिसमधूनच 1.2 दशलक्ष डॉलर कमाई केली आहे. तर जाहिरातीतून त्याने 52 दशलक्ष डॉलर कमावले आहेत. ओसाकाच्या रँकिंगमध्ये पण घसरण झाली आहे. तो 15 व्या स्थानावरुन आता 20 व्या क्रमांकावर घसरला आहे.

श्रीमंत क्रिकेटपटू

महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भले ही संन्यास घेतला असला तरी तो आयपीएलमध्ये रन मशीन ठरला आहे. केवळ क्रिकेटच्या पिचवरच नाही तर तो इतर माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. श्रीमंत किक्रेटपटू त्याची पहिल्या काही क्रिकेटपटूमध्ये गणना होते. बिझनेसच्या पिचवर त्याने धमाल केली आहे. ब्राँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.