Gold Price Today: सोना कितना सोना है… सोनेच नव्हे तर चांदीही महागली; आजचे भाव करा चेक

गेले दोन दिवस स्वस्त झालेले सोने-चांदी पुन्हा एकदा महागले आहे. जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे भाव वाढल्याने त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Gold Price Today: सोना कितना सोना है... सोनेच नव्हे तर चांदीही महागली; आजचे भाव करा चेक
चांदी
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 4:45 PM

मुंबई :  लागोपाठ दोन दिवस सोने-चांदी स्वस्त झाल्याने सोने खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा, सबुरीने घ्या. कारण सलग दोन दिवस सोन्याच्या भावात (Gold Price) घसरण झाल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी मात्र सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. आज केवळ सोनेच नव्हे तर चांदीचे दरही (Silver Price) वाढले आहेत. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे आज सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. म्हणूनच सोने, चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी आजचे भाव जाणून घ्या आणि मगच घरातून बाहेर पडा. मात्र, आज जरी सोन्या-चांदीचे भाव वाढले असले तरी या किमती अशाच स्थिर राहतील असं नाही. जागतिक बाजारपेठेत (Global market) कधी काय घडेल याचा नेम नाही. त्यामुळे आज महागलेलं सोनं उद्या स्वस्तही होऊ शकतं किंवा त्याचे भाव अजून वाढूही शकतात.

मल्टिकमॉडिटी एक्सचेंजवर (MCX),आज सकाळी 24 कॅरेटच्या शुद्ध सोन्याचा भाव 170 रुपयाने वाढून 50,670 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. यापूर्वी सोन्याच्या ट्रेडिंगची सुरुवात 50,661 वरून सुरू झाली होती. परंतु, सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे लगेच त्याच्या किमतीत वाढ झाली. सोन्याचे दर ज्या भावावर थांबले होते, त्यापेक्षा आता 0.34 टक्क्याची वाढ घेऊन सोन्याची घोडदौड सुरू आहे. यापूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली होती. त्यामुळे सोन्याचे दर सलग दोन दिवस पडले होते.

चांदीची चमक वाढली

सोन्याप्रमाणेच आज सकाळी चांदीची किंमतही वाढताना दिसली. मल्टिकमॉडिटी एक्सचेंजवर चांदीचा वायदे बाजारातील भाव 327 रुपयांनी वाढून 57,053 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला. यापूर्वी चांदीच्या ट्रेडिंगची सुरुवात 57,177 रुपयांवरून झाली होती. मागणी कमी झाल्याने चांदीच्या भावात घसरण झाली होती. पण आता ही किंमत 57 हजारांवर गेली आहे. चांदीचे भावही ज्या भावावर थांबले होते, त्यापेक्षा आता 0.58 टक्क्याची वाढ घेऊन ट्रेडिंग होत आहे.

हे सुद्धा वाचा

ग्लोबल मार्केटमध्येही वाढ

आज ग्लोबल मार्केटमध्येही सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली दिसली. अमेरिकेच्या बाजारात सोन्याचं हाजीर मूल्य 1,744.83 डॉलर प्रति औंस आहे. हे दर आधीच्या बंद भावाच्या 0.35 टक्के अधिक आहे. अशाच प्रकारे चांदीचे मूल्य 19.28 डॉलर प्रति औंसवर गेले आहे. हे दरही चांदीच्या आधीच्या बंद भावाच्या 0.67 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यापूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या भावात सलग दोन दिवस घसरण पाहायला मिळाली होती.

पुढे काय होणार?

सोन्या-चांदीच्या भावात सध्या मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये घसरण झाल्याने भारतीय बाजारात सोने स्वस्त झाले होते. त्यापूर्वी सरकारने आयात शुल्कात वाढ केल्याने सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, डॉलरची किंमत वाढत असल्याने सोन्याचे भाव अजून वाढू शकतात. ग्लोबल मार्केटमध्ये होणाऱ्या सोन्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोन्याचे भाव चढते राहू शकतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.