सोन्याचा पुन्हा जलवा; किमतीत जवळपास दोन हजारांची वाढ, जाणून घ्या आजचे दर!
नाशिकमध्ये बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 51500 रुपये नोंदवले गेले. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 53890 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे 49400 रुपये नोंदवले गेले.
नाशिकः नाशिकमध्ये बुधवारी सोने (Gold) आणि चांदीचे दर महागले. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 51500 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे (Silver) दर किलोमागे 70 हजार रुपयांवर गेले. हे दर तीन टक्के जीएसटीसह आहेत, अशी माहिती दी नाशिक (Nashik) सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 53890 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे 49400 रुपये नोंदवले गेले. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 53840 रुपये नोंदवले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 49350 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 53890 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 49400 रुपये नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन युद्धाने सारे जग ढवळून निघाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षितता म्हणून सोन्याकडे वळत आहेत आणि सोन्याचे भाव वाढताना दिसत आहेत.
असे मिळवा भाव…
तुम्ही सोन्या चांदीचा भाव मिस-कॉलद्वारे अगदी घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. ibja कडून केंद्र सरकारने घोषित केलेल्या सुट्ट्या शिवाय शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सोन्याचे भाव जाहीर केले जात नाहीत. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट चे भाव जाणून घेण्यासाठी 8955664433 वर तुम्ही मिस कॉल देखील देऊ शकतात. काही वेळातच तुम्हाला एसएमएस द्वारे सोन्या चांदीचे दर कळून जातील.अधिक अपडेट साठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटवर भेट देऊ शकता.
महाराष्ट्रातले दहा ग्रॅममागचे दर
(22 कॅरेट सोने) – मुंबई – 49350 – पुणे – 49400 – नागपूर – 49400 – नाशिक – 51500
सोने आणि चांदीचे दर महागले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 54800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 51500 रुपये नोंदवले गेले. तर चांदीचे दर किलोमागे 70 हजार रुपयांवर गेले. हे सारे दर तीन टक्के जीएसटीसह आहेत. गेल्या दोन दिवसांत साधरणतः दीड ते दोन हजारांनी भाववाढ झाली आहे. येणाऱ्या काळात हे भाव पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन इतर बातम्याः