TMC Corporator : ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, उद्यापासून प्रशासकीय राजवट सुरू
येणाऱ्या आगामी महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. या कार्यकाळात 131 नगरसेवक होते तर प्रभाग रचनेमुळे 11 नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी, भाजप, मनसे आणि इतर पक्ष कामाला लागले आहेत. तसेच महिलांना देखील 50 टक्के आरक्षण असल्याने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या आहेत.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील नागसेवकां (Corporators)चा आज कार्यकाळ संपला असून उद्यापासून ठाणे महानगर पालिकेवर प्रशासकीय राजवट (Administrative Rule) लागू होणार आहे. हा नगरसेवकांचा शेवटचा दिवस असल्याने सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांनी एकत्रित येऊन समारोप सोहळा साजरा केला. या समारोप सोहळ्या दरम्यान सर्व नगरसेवक आणि नगरसेविकेने एकत्रितपणे फोटो सेशन देखील केले. यावेळी पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा देखील उपस्थित होते. या फोटो सेशनसाठी महापालिकेच्या हिरवळीवर भव्य असा स्टेज बांधण्यात आला होता. समारोप सोहळ्या निमित्ताने ठाणे महानगर पालिकेतील नगरसेवकाची भेट पहिल्यांदाच राबवण्यात आला आहे. (Term of Thane Municipal Corporation corporators is over, administrative rule will start from tomorrow)
ठाणेकरांच्या सेवेसाठी पुन्हा लढा देणार
या पाच वर्षात सेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षामध्ये नागरी समस्या, विकास कामे या मुद्यावरून नेहमीच सभागृहात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या पाच वर्षात सभागृहात देखील खडाजंगी पहायला मिळाली. मग तो पाण्याचा विषय असो या विकास कामांचा. या पाच वर्षात जरी विकास कामे आणि नागरिक सुविधांच्या मुद्यावरून ओढले गेले असले तरी ते मतभेद नसून वैचारिक भेद असल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात आले. भविष्यात पुन्हा एकदा नगरसेवक पद भूषवून महालालिकेच्या सभागृहात ठाणेकरांच्या सेवेसाठी पुन्हा लढा देणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले आहे.
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर
आगामी होणाऱ्या निवडणुकीत obc आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय आयोग याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना गेल्या वेळी obc आरक्षण होते. त्यावेळी आम्ही खुल्या वर्गातून निवडून आलो होतो. त्यामुळे यावेळी देखील तशीच परिस्थिती ओढवल्यास पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानुसार आम्ही निवडणूक लढवू असे नगरसेवकांनी सांगितले आहे.
प्रभाग रचनेमुळे 11 नगरसेवकांची वाढ होणार
येणाऱ्या आगामी महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. या कार्यकाळात 131 नगरसेवक होते तर प्रभाग रचनेमुळे 11 नगरसेवकांची वाढ होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी, भाजप, मनसे आणि इतर पक्ष कामाला लागले आहेत. तसेच महिलांना देखील 50 टक्के आरक्षण असल्याने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या आहेत. त्यामुळे महापौर पदी महिला देखील सक्षम नेतृत्व करू शकतात असे माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले. तर आमदार पदी देखील महिलांना प्राधान्य दिले गेले पाहिजे असे सूचक वक्तव्य माजी महिला महापौर मिनाक्षी शिंदे यांनी सांगितले आहे. (Term of Thane Municipal Corporation corporators is over, administrative rule will start from tomorrow)
इतर बातम्या
ना करवाढ, ना दरवाढ, केडीएमसीचं ‘मिशन हेल्थ’; 1773 कोटी 56 लाखाचा अर्थसंकल्प सादर