घडलंय बिघडलंय ! शिंदे गट-भाजपच्या वादाचं लोण आता उल्हानगरापर्यंत; शिवसेनेची बॅनरबाजी, तर भाजपची टोलेबाजी

कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपताना दिसत नाहीये. हा वाद उल्हासनगरमध्ये पोहोचला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या काळात भाजप - शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षातील वाद वाढणार? की संपणार? हे पाहावं लागेल.

घडलंय बिघडलंय ! शिंदे गट-भाजपच्या वादाचं लोण आता उल्हानगरापर्यंत; शिवसेनेची बॅनरबाजी, तर भाजपची टोलेबाजी
shinde factionImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 6:37 AM

उल्हासनगर : शिंदे गट आणि भाजपमधील वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीये. कल्याण-डोंबविली पुरता मर्यादित असलेला हा वाद आता थेट उल्हासनगरापर्यंत पोहोचला आहे. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे. तर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याला उत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गट आणि भाजपमधील ही तू तू मै मै अजूनच पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. तसेच नेते एकत्र आले, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचे मन जुळत नसल्याचंही या वादातून दिसून येत असल्याची चर्चा आहे.

कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नसून या वादाचे पडसाद आता उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे. “कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है…! माझा नेता माझा अभिमान” अशा आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प-4 मध्ये आशान यांनी लावले आहेत.

हे सुद्धा वाचा

छोटे छोटे कार्यकर्ते स्वत:ला

यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत टोला लगावला आहे. ‘युतीची सत्ता आल्यावर काही छोटे छोटे कार्यकर्ते आम्हीच शिंदे साहेब आहोत, आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, असा त्यांना गर्व झाला आहे. ते स्वत:ला एकनाथ शिंदे समजत आहेत. त्यांना वाटतं आमच्याशिवाय कोणीच नाही’, असा टोला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी लगावला आहे.

लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख

उल्हासनगरमधील शासनाची एक पाटी व्हायरल झाली आहे. यावर आमदार म्हणून गणपत गायकवाड यांच्या ऐवजी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा उल्लेख आमदार म्हणून केला आहे. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कार्यक्रम करताना सर्व नेत्यांनी याची खात्री केली पाहिजे की आपण कार्यक्रम करतोय आणि एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्याचे आमदार म्हणून नाव टाकतो.

याबद्दल नेत्यांनी विचार केला पाहिजे की आपण ज्या कार्यक्रमाला जात आहोत त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मी तिथला आमदार असतानाही तिथे गोपाळ लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख केला गेला. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. पण त्यांचा आमदार म्हणून उल्लेख केला जातो माझ्या त्यांना शुभेच्छा, असा चिमटा गणपत गायकवाड यांनी काढला आहे.

Non Stop LIVE Update
detail
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.