Congress Plan for Lok Sabha Election: 2024 ; काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार ; आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा मोठा प्लॅन…

पंजाब, यूपी, बंगाल, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तामिळनाडू, पुडुचेरी, आसाम, ओडिशा, उत्तराखंड यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी लवकरच पक्ष संघटनेत नव्या टीमची घोषणा केली जाईल असंही त्यांनी म्हटले होते.

Congress Plan for Lok Sabha Election: 2024 ; काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार ; आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा मोठा प्लॅन...
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 11:51 PM

नवी दिल्ली : मल्लिकार्जुन खर्गे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस संघटनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेशातून आल्यानंतर जून अखेरीपर्यंत त्या प्रकारच्या घोषणा होऊ शकतात असंही सूत्रांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षाची सूत्रं हाती घेतल्यानंतर खर्गे यांनी आता काँग्रेसच्या संघटनेतील बदलांना अंतिम स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. सध् मल्लिकार्जुन खर्गे राहुल-सोनिया गांधी यांचीची वाट पाहत आहेत. गांधी कुटुंबातील हे सदस्य परत येताच खर्गे त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. त्या चर्चेनंतर हे बदल पक्षासमोर मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खर्गे यांनी बनवलेल्या आरखड्यानुसार सुमारे डझनभर राज्यांचे काँग्रेस अध्यक्ष बदलण्याचा प्रस्ताव आहे. तर यामध्ये दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी आणि पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी हे आघाडीवर आहेत.

अनिल चौधरी – दिल्ली, अलागिरी – तामिळनाडू, मोहन मरकम-छत्तीसगड, राजेश ठाकूर-झारखंड, ब्रिजलाल खबरी-यूपी, अधीर रंजन चौधरी – बंगाल, गोविंद सिंग दोतासरा – राजस्थान, नबाम तुकी – अरुणाचल प्रदेश, सुधाकरन – केरळ, नाना पटोले – महाराष्ट्र, तर त्याच वेळी, सुमारे डझनभर राज्यांच्या प्रभारी सरचिटणीसांना हटवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामध्ये पंजाब, यूपी, बंगाल, महाराष्ट्र, केरळ, झारखंड, तामिळनाडू, पुडुचेरी, आसाम, ओडिशा, उत्तराखंड यांचा समावेश आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी लवकरच पक्ष संघटनेत नव्या टीमची घोषणा केली जाईल असंही त्यांनी म्हटले होते.

अशा स्थितीत हरीश चौधरी, अविनाश पांडे, ओम्मान चंडी, एच के पाटील, दिनेश गुंडूराव, देवेंद्र यादव या नेत्यांना केंद्रीय संघटनेतून काढून राज्यांमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे.

तर त्याचबरोबर बीके हरिप्रसाद, अलका लांबा, गौरव गोगोई, ज्योती मणी, संजय निरुपम, दीपेंद्र हुडा यांसारख्या नेत्यांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.

त्यासोबतच प्रियांका गांधी आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांना 2024 च्या निवडणुकीसाठी रणनीती बनवण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

तर काँग्रेसचे नेते अखिलेश प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका गांधी यांची मोठी भूमिका असणार आहे.

याशिवाय, नोव्हेंबरमध्ये 5 वर्षे पूर्ण करत असलेल्या काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांचाही काँग्रेसवर मोठा प्रश्न आहे.

गांधी कुटुंबीयांबरोबर चर्चा करून खर्गे यांना कायम ठेवायचे की केरळची कमान सोपवायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासोबतच युवक काँग्रेस, एनएसयूआय, सेवादलाचे नवे प्रमुखही करण्यात येणार आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.