Pune Ganeshotsav : पंचकेदार मंदिरात यंदा विराजमान होणार दगडूशेठ गणपती बाप्पा; सजावटीच्या कामाचा श्रीगणेशा..!

पुण्याच्या सणस मैदानासमोरच्या हिराबाग कोठीमध्ये दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सजावट विभागात या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांनी याची सुरुवात केली.

Pune Ganeshotsav : पंचकेदार मंदिरात यंदा विराजमान होणार दगडूशेठ गणपती बाप्पा; सजावटीच्या कामाचा श्रीगणेशा..!
दगडूशेठ गणपती मंदिराच्या गणोशोत्सवात उभारली जाणारी पंचकेदार मंदिराची प्रतिकृतीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 2:17 PM

पुणे : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी पुण्यात सुरू झाली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने (Dagdusheth Ganpati) आतापासूनच गणेशोत्सवाची केली तयारी सुरू केली आहे. यंदाच्या वर्षी पंचकेदार मंदिर हिमालय याची प्रतिकृती साकारली जाणार आहे. मंदिराच्या देखाव्याच्या कामाला आजपासून सुरुवात होत आहे. पूजा करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. प्रत्यक्ष शिवाचा निवास असलेल्या पाच शिव मंदिरांचा हा समूह पंचकेदार मंदिर (Panchkedar temple) या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला आहे. शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. दरम्यान, कोरोनाच्या सावटात मागील दोन वर्ष गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या होत्या. यंदा धुमधडाक्यात हा उत्सव साजरा होणार आहे.

हिराबाग कोठीत झाला शुभारंभ

पुण्याच्या सणस मैदानासमोरच्या हिराबाग कोठीमध्ये दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या सजावट विभागात या कामाचा शुभारंभ करण्यात आला. शिल्पकार विवेक खटावकर आणि वैशाली खटावकर यांनी याची सुरुवात केली. शंकराच्या केदारनाथ, तुंगनाथ, रुद्रनाथ, मध्यमहेश्वर आणि काल्पेश्वर या पाच नावांनी पंचकेदार प्रसिद्ध आहे. हिमालयातील हे एक प्राचीन मंदिर आहे. दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात हे पंचकेदार मंदिर उभारले जाईल. यात बाप्पा विराजमान होणार आहे.

हे सुद्धा वाचा

देखाव्याचे वैशिष्ट्य काय?

पंचकेदार मंदिर शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार साधारणपणे 100 फूट लांब, 50 फूट रूंद तर 81 फूट उंच असणार आहे. सुंदर अशा लाकडावर कोरीवकाम त्याचप्रमाणे आकर्षक रंगसंगतीने हे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर त्यावर दिवे बसवले जाणार आहेत. सजावटीच्या या कामात जवळपास 40 कारागीर काम करीत आहेत. राजस्थानातील कारागीर रंगकाम करणार आहेत. मुख्य सभामंडपात भाविकांना दर्शन घेताना अडचण येवू नये, म्हणून सुटसुटीत रचना केली जाणार आहे. लांबून दर्शन घेणे यामुळे सोयीस्कर होणार आहे. दरवर्षी दगडूशेठ गणपती ट्रस्ट नवनवीन देखावे सादर करत असते. देशभरातील प्राचीन मंदिरांच्या प्रतिकृती गणेशोत्सव सोहळ्यात उभारल्या जातात. भाविकांसाठीही हे मोठे आकर्षण असते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.