Pune tree fall : कामावरून परतत असतानाच काळाचा घाला, चाकणमध्ये झाड कोसळून दुचारीस्वार ठार; तर दुसऱ्या घटनेत कारचा चक्काचूर

कामावरून परतत असताना या दुचाकीस्वरावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. दुसऱ्या घटनेत चालत्या कारवर झाड कोसळले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना खेड तालुक्यातील चाकण झित्राई मळा येथे घडली आहे.

Pune tree fall : कामावरून परतत असतानाच काळाचा घाला, चाकणमध्ये झाड कोसळून दुचारीस्वार ठार; तर दुसऱ्या घटनेत कारचा चक्काचूर
चाकणमध्ये कारवर कोसळलं झाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 1:29 PM

चाकण, पुणे : झाड कोसळून (Tree fall) नुकसान झाल्याच्या दोन घटना पुणे जिल्ह्यातल्या चाकण, खेड परिसरात घडल्या आहेत. यातील एका घटनेचा एकाचा बळीदेखील गेला आहे. पहिली घटना चाकण-तळेगाव रस्त्यावरील तर दुसरी घटना चाकण झित्राई मळा येथे घडली आहे. खराबवाडी गावातील जय मल्हार हॉटेलच्या समोर आणि एका कंपनीच्या जवळ एका दुचाकीवर रस्त्याच्या कडेचे झाड कोसळले. यात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू (Dead) झाला तर आहे. तर एक गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या कडेची झाडे काढण्यासाठी कळवूनही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) याकडे सपशेल कानाडोळा करत आहे. त्याचा परिणाम म्हणून अशा झाडांच्यामुळे निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागत आहे.

कामावरून परतत असतानाच घडली दुर्दैवी घटना

कामावरून परतत असताना या दुचाकीस्वरावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्ती केली जात आहे. अपघातस्थळी महाळुंगे वाहतूक विभाग व महाळुंगे पोलीस चौकीचे कर्मचारी दाखल झाले. वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी तत्काळ महाळुंगे पोलीस चौकीचे कर्मचारी विठ्ठल वडेकर, अभिजित भोर, प्रितम ढमढेरे, श्रीधर इचके तसेच वाहतूक विभागाचे विलास तळपे, प्रमोद भोजने, स्वप्निल दौंडकर उपस्थित होऊन जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले. जखमीची प्रकृतीही चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

जीवितहानी नाही, मात्र कारचे नुकसान

दुसऱ्या घटनेत चालत्या कारवर झाड कोसळले. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना खेड तालुक्यातील चाकण झित्राई मळा येथे घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी चाकण नगरपरिषद, अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले होते. कारवर पडलेले झाड बाजूला करून नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, पावसामुळे अनेक ठिकाणचे वृक्ष मोडकळीस आले आहेत. ते पडण्याच्या आधीच काढावीत, अशी मागणी होत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.