देशाच पहिल्यांदाच हा प्रकल्प फक्त पुण्यात, पुणेकरांसाठी अभिमानाची बाब

पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे. डीबुट पध्दतीने हा प्रकल्प होणार आहे.

देशाच पहिल्यांदाच हा प्रकल्प फक्त पुण्यात, पुणेकरांसाठी अभिमानाची बाब
पुणे शहरात निर्माण केला जाणारा कचरा निर्मिती प्रकल्प
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:18 AM

पुणे : नवी दिल्ली शहर कचरामुक्त करण्याचे आश्वासन देत अरविंद केजरीवाल सत्तेत आले. परंतु दिल्लीतील कचऱ्याचे साम्राज्य कमी होत नाही. आप सरकार यासंदर्भात आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करत असताना पुणे शहराने बाजी मारली आहे. देशात प्रथमच कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. पुणे शहरात महानगरपालिकेकडून हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. ‘द ग्रीन बिलियंस लिमिटेड’ (TGBL) या कंपनीशी पुणे मनपाने 30वर्षांचा करार केला आहे. या प्रकल्पात पुढील वर्षापासून रोज 350 टन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती होणार आहे. त्यासाठी कंपनी 350 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तसेच लॉजिस्टीक व इतर सुविधांसाठी 82 कोटी खर्च करणार आहेत. पुणे येथील हडपसर इंडस्ट्रियल एस्टेट (Hadapsar Industrial Estate) मध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

किती होणार हायड्रोजन निर्मिती

पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला प्रकल्प उभारला जाणार आहे. डीबुट पध्दतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या प्रकल्पात दिवसाला सुमारे 350 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली होणार आहे. त्याद्वारे 150 टन आरडीएफ तर 9 मेट्रिक टन हायड्रोजन निर्मिती होणार आहे.

हे सुद्धा वाचा

कसा असणार प्रकल्प

बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेबल तसेच घरगुती घातक मिश्र कचऱ्यावर ऑप्टीकल सेन्सर वापरून आधी विलग केला जाणार आहे. ओला कचरा जैविक कचरा करण्यासाठी वापरणार आहे. त्यानंतर कचऱ्यावर प्रक्रीया करून प्लाझ्मा गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोजन वायू तयार केला जाईल. भाभा अनुसंधान संस्था आणि आयआयएससी बेंगलुरूने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

हा कचरा शास्त्रोक्त पध्दतीने भूगर्भात कॅपिंग केला तरी त्यापासून मोठया प्रमाणात मिथेन वायू तयार होतो. तसेच त्यासाठी मोठया प्रमाणात जागाही लागते. ही बाब लक्षात घेऊन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीचा हा प्रकल्प शहरासाठी वरदान ठरणार आहे. तसेच यातून निर्माण होणारा गॅस घरगुती तसेच व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणार आहे. तसेच शहरातील कार्बन उर्त्सजन कमी होण्यासही हातभार लागणार आहे.

हायड्रोजन भविष्यातील इंधन

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे म्हटले होते. भारत सरकार हायड्रोजनचा अवलंब करण्यावर जोर देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.