शरद पवार यांचं लग्न कसं जुळलं? कोणी बांधली होती लग्नाची गाठ?

शरद पवार यांच्या लग्नाची गाठ बांधण्यात त्यांच्या जेष्ठ बंधूंचा हात होता. एक मुलगा आहे. शिक्षण चांगले झालंय. बीकॉम केलंय. पण स्वत: काही करत नाही. नुकताच आमदार झाला आहे. गावाकडे शेती आहे.

शरद पवार यांचं लग्न कसं जुळलं? कोणी बांधली होती लग्नाची गाठ?
शरद पवार आणि प्रतिभा पवारImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 10:26 AM

पुणे : राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर देशात अन् राज्यात नेतृत्व केलं. राजकारणाच्या खेळपट्टीवर आघाडीवर येऊन ते फलंदाजी करत राहिले. कारण त्यांनी मिळालेली उत्तम साथ अर्थात प्रतिभाताई (Pratibha Pawar)यांच्यांकडून. सध्या व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा होत असताना शरद पवार आणि प्रतिभाताई यांचं लग्न कसे जुळले? याची माहिती अनेकांना नाही. पुण्यातील सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांच्या कन्या प्रतिभाताई आहेत. 1 ऑगस्ट 1967 या दिवशी बारामती येथे शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह झाला.

नुकतेच आमदार झाले

शरद पवार यांच्या लग्नाची गाठ बांधण्यात त्यांच्या जेष्ठ बंधूंचा हात होता. एक मुलगा आहे. शिक्षण चांगले झालंय. बीकॉम केलंय. पण स्वत: काही करत नाही. नुकताच आमदार झाला आहे. गावाकडे शेती आहे, असे स्वत: शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू माधवराव पवार यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांना सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सदू शिंदे यांच्या मुलीसाठी माधवराव यांनी ही स्थळ सुचवलं. सदू शिंदे भारतीय क्रिकेटचे खेळाडू. 1946 ते 1955 दरम्यान सात कसोटी सामने ते खेळले आहे. त्यांनी ‘एक उत्कृष्ट गुगली गोलंदाज’ असा नावलौकिक मिळवला आणि भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले. विजय मर्चंट, रंगा सोहनी, पॉली उम्रीगर, विजय हजारे, खंडू रांगणेकर, दत्तू फडकर हे वडिलांचे सहकारी होते.

वर्तमानपत्र चाळत बसले

सदू शिंदे यांची जेष्ठ कन्या प्रतिभा हिला पाहाण्याचा कार्यक्रम ठरला. पाहाण्याच्या कार्यक्रमात शरद पवार वर्तमानपत्र उघडून चाळत बसले होते. वर्तमानपत्रात त्यांनी जे डोके घातले, ते शेवटपर्यंत वर काढले नाही. असं म्हणतात, शरद पवार यांनी प्रतिभाताईंना पाहिले सु्द्धा नाही आणि लग्नाला होकार दिला.

विवाहाच्या दिवशी प्रचंड पाऊस

1ऑगष्ट 1967रोजी शरद पवार आणि प्रतिभा यांचा विवाह बारामतीत झाला. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे आली होती. कारण त्याच वर्षी शरद पवार आमदारही झाले होते. यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक शरद पवार यांच्या लग्नाला आले होते.

शरद पवार व प्रतिभा पवार यांना एकच कन्या आहेत. त्या म्हणजे बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे.त्या सुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजकारणात उतरल्या आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.