Navneet Rana : लोक जेलमधून खेदानं घरी जातात, आम्ही अभिमानाने घरी जातोय – नवनीत राणा

हनुमान चालिसाचा विरोध म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं. रामभक्त आणि हनुमान भक्त आमची वाट पाहणार आहेत. आम्ही 12.45 ला नागपूरला लँड होऊ. रामनगरातील मंदिरात हनुमान चालिसा म्हणू. मोझरी, गुरुकूल यांच्या समाधीचं दर्शन घेऊ. नांदगाव ते पंचवटी या ठिकाणी कार्यकर्ते सत्कार करणार आहेत.

Navneet Rana : लोक जेलमधून खेदानं घरी जातात, आम्ही अभिमानाने घरी जातोय - नवनीत राणा
नवनीत राणा
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 10:56 AM

नागपूर : नागपूरमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दिल्ली विमानतळावर राणा दाम्पत्यानं टीव्ही 9 शी संवाद साधला. तब्बल 36 दिवसांनंतर राणा दाम्पत्य हे अमरावती येथे परत येत आहेत. दरम्यान, ते मुंबई येथे सुमारे 14 दिवस कैदेत होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल होते. तिथून थेट नवी दिल्लीला गेले. तिथं त्यांनी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारविरोधात (Government of Maharashtra) तक्रार केली. नवनीत राणा म्हणाल्या, अमरावतीकर हे माझं कुटुंब आहे. पहिल्यांना मी एवढे दिवस अमरावती बाहेर राहिली. जेलमधून पहिल्यांना परत जात आहे. लोकं जेलमधून खेदानं घरी जातात. पण, मी अभिमानानं घरी जात आहे. अमरावतीमधून मला फोन येतात. त्यामुळं अमरावतीला जाताना सुरुवातीला नागपूरला विमानानं उतरेन. त्याठिकाणी गेल्यानंतर रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा वाचणार आहे. त्यानंतर अमरावतीला परत जाईल. तत्पूर्वी नागपूर विमानतळावरून रॅली काढण्यात येणार होती. पण, या रॅलीला पोलीस आयुक्तांनी (Commissioner of Police) परवानगी नाकारली. जनता जाते दर्शन घेते तसंच आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. शांततेनं हनुमान मंदिरात जाणार. हनुमान चालिसा म्हणणार. आरती करून अमरावतीला परत जाणार असल्याचं खासदार नवनीत राणा यांनी नवी दिल्ली येथील विमानतळावर सांगितलं.

कोण आहेत प्रशांत पवार?

अमरावतीत भव्य हनुमान चालिसा म्हणून घरी जाणार असल्याचं सांगितलं. पण, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसही राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक झाली. आम्हाला डिवचलं तर नागपुरात पाय ठेऊ देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रशांत पवार यांनी घेतली. त्यावर नवनीत राणा म्हणाल्या, मी पवार साहेबांना ओळखते. प्रशांत पवार कोण आहेत, माहीत नाही. यावेळी आमदार रवी राणा म्हणाले, हनुमान चालिसाचा विरोध म्हणून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं. रामभक्त आणि हनुमान भक्त आमची वाट पाहणार आहेत. आम्ही 12.45 ला नागपूरला लँड होऊ. रामनगरातील मंदिरात हनुमान चालिसा म्हणू. मोझरी, गुरुकूल यांच्या समाधीचं दर्शन घेऊ. नांदगाव ते पंचवटी या ठिकाणी कार्यकर्ते सत्कार करणार आहेत. अमरावतीच्या प्रत्येक चौकात आमचं, हनुमान चालिसाचं स्वागत करणार आहेत. असं पहिल्यांदा विदर्भात दिसणार आहे. हनुमान भक्तांना ह्रदयात ठेवायचं जेलमध्ये नाही, असा संदेश यातून दिला जाणार असल्याचं रवी राणा म्हणाले.

पांडे यांच्यावर कारवाई होईल

नवनीत राणा यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात चार अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत बोलावण्यात आलंय. कमी असं होतं की, प्रिव्हिलेज अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत बोलावलं जातं. राणा यांचं दिल्लीतील कमिटीला वाटलं की, संबंधित अधिकाऱ्यांनी अन्याय केला. त्यामुळं नोटीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. सी. पी. पांडे यांच्यावर कारवाई होईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.