Navi Mumbai Child Death : चार वर्षाची चिमुकली उद्यानात खेळत होती, असं काय घडलं की वडिलांसमोरच चिमुकलीने…

चिमुकली बापासोबत उद्यानात खेळायला गेली. पण बाप-लेकिचा हा एकत्र शेवटचा क्षण ठरला. यानंतर चिमुकली कधीच वडिलांसोबत खेळू शकणार नाही.

Navi Mumbai Child Death : चार वर्षाची चिमुकली उद्यानात खेळत होती, असं काय घडलं की वडिलांसमोरच चिमुकलीने...
खारघरमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंतImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 12:51 PM

नवी मुंबई / 29 ऑगस्ट 2023 : नवी मुंबईतील खारघर परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. चार वर्षाची चिमुकली वडिलांसोबत उद्यानात खेळायला गेली होती. मात्र बाप-लेकीचा हा खेळ अखेरचा ठरणारी दुर्देवी घटना यावेळी घडली. खेळून दमली म्हणून उद्यानातील बेंचवर बसायला गेली. पण बेंच तुटलेला असल्याने ती खाली पडली आणि बेंच तिच्या अंगावर पडला. यामुळे चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे उद्यानांतील दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकांच्या दुर्लक्षतेमुळे उद्यानांची दुरावस्था झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काय घडलं नेमकं?

खारघर येथील रहिवासी प्रकाश विश्वकर्मा हे सेक्टर 12 येथे सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. त्यांना 4 वर्षाची मुलगी आहे. मुलगी वडिलांसोबत खारघर येथील उद्यानात खेळायला गेली होती. वडिल एका बेंचवर बसले होते आणि मुलगी खेळत होती. खेळता खेळता दम लागला म्हणून चिमुरडी उद्यानातील एका बेंचवर बसायला गेली. मात्र बेंच तुटलेला असल्याने बसायला जाताना तो मुलीच्या अंगावर पडला.

मुलीच्या अंगावर बेंच पडलेला पाहताच वडील धावत गेले. वडिलांनी कसाबसा अवजड बेंच उचलून बाजूला केला. यानंतर वडिलांनी मुलीला तात्काळ खाजगी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डोळ्यासमोर लेकिचा मृत्यू पाहून बापाला मानसिक धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उद्यानांकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने उद्यानांची दुरावस्था झाली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्यानातील बेंच स्थानिक माजी नगरसेविकेने बसवले असून, त्यांची अवस्था दयनीय आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिका आणि लोकप्रतिनिधींवर रोष व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.