सॅल्यूट! सॅल्यूट! सॅल्यूट! रतन टाटा यांची चक्क नॅनोतून ताजमध्ये एन्ट्री, साधेपणाचा खरा अर्थ हाच

Ratan Tata Nano Video : हल्लीच्या जमान्यात नेतेमंडळी, उद्योगपती, अभिनेते, सेलिब्रिटी सगळ्यांना आलिशान गाड्यांमधून फिरण्याचा शौक असल्याचं पाहायला मिळतं.

सॅल्यूट! सॅल्यूट! सॅल्यूट! रतन टाटा यांची चक्क नॅनोतून ताजमध्ये एन्ट्री, साधेपणाचा खरा अर्थ हाच
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 10:06 AM

मुंबई : मोठ्या माणसांची एक खास गोष्ट असते. ती आपलं मोठेपण कधीच जाणवू देत नाहीत. ही बाब रतन टाटा (Ratan Tata) यांना तंतोतंत लागू होते. त्यांनी आपल्या कृतीतून सातत्यानं ही बाब अधोरेखित केली आहे. नेहमीच त्यांनी आपल्या साध्या राहणीनं सगळ्यांना चकीत केलेलंय. आता पुन्हा एकदा तशीच बाब रतन टाटा यांनी केली आहे. गाडी आणि त्यातही आलिशान गाडीचा शौक कुणाला नसतो? मोठमोठ्या गाड्यांमधून फिरण्याची स्वप्न सामान्य माणूसही पाहतो. पण प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची स्वतःची गाड्यांची कंपनी असूनही त्यांनी ज्या गाडीतून ताजमध्ये एन्ट्री मारली आहे, ती फारच खास ठरली. टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीच्या सर्वात स्वस्त समजल्या जाणाऱ्या नॅनोमधून (Tata Nano) रतन टाटा यांनी ताज हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या या प्रवेशाची चर्चा सोशल मीडियात तुफान झाली. आपल्या साधेपणानं सगळ्यांना मनात आपुलकीचं स्थान मिळवलेल्या रतन टाटा यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना अवाक् केलंय.

एक ही तो दिल है…कितनी बार जितोगे…

रतन टाटा यांची नॅनोतली इन्ट्री ही जगावेगळी घटना नाही. सर्वसामान्य कृती आहे. पण ही सर्वसामान्य कृती त्यांच्यासारख्या माणसाला अधिक खुलवते. कारण, हल्लीच्या जमान्यात नेतेमंडळी, उद्योगपती, अभिनेते, सेलिब्रिटी सगळ्यांना आलिशान गाड्यांमधून फिरण्याचा शौक असल्याचं पाहायला मिळतं. गावचा संरपंचही, किंवा अगदी नगरसेवकपण स्कॉर्पिओ किंवा इनोव्हाच्या खाली नसतो. अशावेळी अवघ्या लाखभर रुपयांच्या नॅनोतून जेव्हा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाका ताजमध्ये पोहोचतात तेव्हा काहींच्या भुवया उंचावणं स्वाभाविकच आहे.

हे सुद्धा वाचा

पाहा व्हिडीओ :

..म्हणून ही गाडी आणखी खास!

सध्या टाटाच्या इलेक्ट्रीक गाड्यांची क्रेझ आहे. टाटा नॅक्सन ही त्यातही आघाडीवर आहे. अशातच ज्या नॅनो कारमधून रतन टाटांनी ताजमध्ये दिमाखात इन्ट्री केली ही नॅनोदेखील इलेक्ट्रीक होती. ही कस्टमाईज कार खास रतन टाटा यांनी आपल्यासाठी बनवून घेतली आहे. म्हणूनच ही गाडी आणखी खास ठरते. त्यामुळे आता लवकरच टाटा नॅनो ही देखील इलेक्ट्रीक वर्जनमध्ये बाजारात येणार आहे की काय? याचीही चर्चा रंगली आहे.

पाहा tv9 स्पेशल : वडिलांसाठी बनवली खास स्कूटर

दुर्मिळ…

एका सर्सामान्य व्यक्तीप्रमाणे रतन टाटा सफेर कलरच्या नॅनोमधून आले. यावेळी त्यांच्यासोबत ना कुणी बॉडीगार्ड होते आणि ना कोणती विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात होती. ही तीच व्यक्त आहे, जी स्वतः एका कार उत्पादक कंपनीची मालक आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे मालकी हक्क त्यांच्याकडे आहे. अफाट संपत्ती असताना, सर्व सुखं पायाशी लोळण घालत असताना क्वचितच पाय जमिनीवर असणाऱ्या व्यक्ती आपल्या समाजात आढळतात. रतन टाटा हे त्यापैकीच एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व आहे.

रतन टाटांची हा व्हिडीओ पाहून तरुणाईसह अनेक सोशल मीडिया युजर्स भारावलेतत. अहंकार, गर्व याची पुसटशीटी रेष रतन टाटा यांच्या देहबोलीत दिसून येत नाही. त्यांचा हा साधेपणा पाहून हॉटेलच्या प्रवेशद्वारावरील व्यक्तीही अवाक् झाल्या होत्या. मंगळवारी जेव्हा रतन टाटा ताजमध्ये गेले होते, तेव्हाचा हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.