Nitin Gadkari on RSS : रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रुग्णालय, नितीन गडकरींनी सांगितला एक खास किस्सा
गडकरी यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुग्णालयाचा एक जुना किस्सा सांगितला. रतन टाटा यांना संघाच्या एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावेळी टाटा यांनी गडकरींजवळ संघाच्या रुग्णालयाबाबत एक संशय व्यक्त केला होता!
पुणे : भांडारकर संस्थेच्या समवसरण या एम्पी थिएटरचं तसंच सिंहगड परिसरात धर्मादाय रुग्णालयाचं उद्घाटन आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नितीन गडकरी यांनी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही असं वक्तव्य केलं. त्यावेळी गडकरी यांनी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुग्णालयाचा एक जुना किस्सा सांगितला. रतन टाटा यांना संघाच्या एका रुग्णालयाच्या (RSS Hospital) उद्घाटनासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावेळी टाटा यांनी गडकरींजवळ संघाच्या रुग्णालयाबाबत एक संशय व्यक्त केला होता!
रतन टाटांबाबतचा किस्सा सांगताना गडकरी म्हणाले की, ‘औरंगाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संङाचे प्रमुख के. बी. हेडगेवार यांच्या नावानं उभं राहिलेल्या रुग्णालयाचं उद्घाटन करायचं होतं. तेव्हा मी राज्य सरकारमध्ये मंत्री होतो. त्यावेळी संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने रुग्णालयाचं उद्घाटन रतन टाटा यांच्या हस्ते व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती’.
गडकरींनी टाटांबाबतचा खास किस्सा सांगितला
He (Ratan Tata) replied as it is an RSS hospital. I told him that it is for every community and there is nothing like this in RSS: Union Minister Nitin Gadkari at the inauguration of a hospital in Pune, Maharashtra (2/2)
— ANI (@ANI) April 14, 2022
‘संघाच्या पदाधिकाऱ्याने इच्छा व्यक्त केल्यानंतर मी रतन टाटा यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना औरंगाबादला येऊन रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी राजी केलं. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर टाटांनी मला एक प्रश्न विचारला. टाटा म्हणाले की, हे रुग्णालय फक्त हिंदू समाजातील लोकांसाठी आहे का? त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्हाला असं का वाटतं?’
गडकरी नेमकं काय म्हणाले?
Inaugurating Smt. Kausalya Karad Charitable Super Speciality Hospital, Pune https://t.co/bweCs0oXeF
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 14, 2022
‘मी विचारलेल्या प्रश्नावर टाटा म्हणाले की, कारण हे रुग्णालय संघाचं आहे. त्यावर मी त्यांना म्हणालो, हे रुग्णालय सर्व समुदायासाठी आहे. या रुग्णालयाला सरसंघचालकांचं नाव दिलं असलं तरी सर्व समाजातील लोक इथे उपचार घेऊ शकतात. संघामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात नाही. त्यावर टाटा खुश धाले आणि त्यांनी आनंदानं रुग्णालयाचं उद्घाटन केलं’, असं गडकरींनी सांगितलं.
इतर बातम्या :