Eknath Shinde : दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य
प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य झाली.
मुंबई : राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी दिली जाणाराय. यासंदर्भातील सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. गोविंदा उत्सव हा राज्यातला मोठा सण. जिल्हाधिकारी (Collector) काही जिल्ह्यात स्थानिक पातळीवर सुटी जाहीर करतात. पण, राज्यात सर्वत्र दहीहंडीनिमित्त सुटी जाहीर करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मुख्य सचिवांना (Chief Secretary) सांगून ही सुटी जाहीर करण्याची सूचना देणार असल्याचं ते म्हणाले. मुंबईत (Mumbai) हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. थरावर थर रचले जातात. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. युवा वर्ग मोठ्या प्रमाणात यात सहभागी होतो.
आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडं मागणी
दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करा, अशी मागणी आमदारानं मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडं केली. शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ही मागणी केली. गेली दोन वर्षे कोरोनामुळं सणांवर बरीच निर्बंध होती. आता हे सण धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झालाय. यंदा अशाप्रकारचे कुठलेही निर्बंध असणार नाहीत. परंतु, न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांचं पालन कराव, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय.
प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य
प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षांपासून दहीहंडीला सार्वजनिक सुटी जाहीर करावी, यासाठी पाठपुरावा करत होते. यंदा त्यांच्या या निवेदनावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक निर्णय घेतला. प्रताप सरनाईक यांची मागणी मान्य झाली. शिंदे यांनी आधीच मला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांनी मी मुख्यमंत्री आहे, असं समजा असं म्हटलं होतं. त्यामुळं शिंदे गटातील आमदारांनी केलेल्या बहुतेक मागण्या ते मान्य करताना दिसून येतात.
यंदा कुठलेही निर्बंध नसणार
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळं सणांवर निर्बंध राहत होते. पण, यंदा अशाप्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. त्यामुळ सणं धुमधडाक्यात साजरी केली जाणार आहेत. त्यात गोविंदाचा म्हणजे दहीहंडीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.