Navneet Rana | खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका? राजस्थानातून आलेल्या व्यक्तीकडून अलर्ट राहण्याचा इशारा? कुणी पाठवलं पत्र?

भाजपतर्फे नवनीत राणा यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेविरोधात सतत वक्तव्य केल्यानेही नवनीत राणा चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र आल्यानं अमरावतीत खळबळ माजली आहे.

Navneet Rana | खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका? राजस्थानातून आलेल्या व्यक्तीकडून अलर्ट राहण्याचा इशारा? कुणी पाठवलं पत्र?
बनावट जात प्रमाणपत्रामुळे नवनीत राणा पुन्हा संकटातImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 12:55 PM

अमरावतीः खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. राणा यांच्या हितचिंतकाने त्यांना एका पत्राद्वारे (Threatening letter) ही माहिती दिली आहे. काही संशयास्पद लोक राजस्थानच्या सीमेवरून अमरावतीत (Amaravati) आले आहेत. ते तुमच्या घरीदेखील येऊन गेले, त्यामुळे मी अल्लाहकडे तुमच्या सुखरुपतेची प्रार्थना करतो. तुम्हाला काहीही होऊ नये, असं वक्तव्य या पत्रातून करण्यात आलं आहे. हनुमान चालिसावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. उद्धव ठाकरे सरकारला त्यांनी चांगलंच कोंडीत पकडलं होतं. त्यामुळे भाजपतर्फे नवनीत राणा यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेविरोधात सतत वक्तव्य केल्यानेही नवनीत राणा चर्चेत असतात. मात्र आता त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र आल्यानं अमरावतीत खळबळ माजली आहे.

पत्रातला मजकूर काय?

नवनीत राणा यांना आलेल्या निवावी पत्रातला मजकूर पुढील प्रमाणे- नमस्ते मॅडम, मै आपको मेरा नाम नही बता सकता हुं। मै आपके ही शहर का एक आम नागरिक हुं. मै आपको आगाह करना चाहता हु की आप थोडा संभलकर रहीये, क्योंकी कुछ लोग आपकी पिछा कर रहे है। आपने मेरे बहोत कामें मे हेल्प कीयी है। मै एक गव्हर्मेंच सरवंट हुं। आपने मेरी ट्रान्सफर कर दिया था और मेरे फादर की कोनोना मे भी बहोत हेल्प कियी है। मै आपको यही बताना चाहता हु की कुछ संदिग्ध लोग राजस्थान बॉर्डर से अमरावती आये है। और मुझे यह जानकारी मिली है की वह लोग आपके घर भी आकर गये है। मै अल्लाह से यही दुवा करुंगा की आप के साथ कुछ भी अनहोनी ना हो. और आप इसि तरह बडे से बडे पद पर जाये, ऐसी दुवा करता हुं। खुदा हाफीस…

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातून धमकी?

अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या व्यक्तीची हत्या झाली होती. भाजपाच्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ कोल्हे यांनी पोस्ट टाकली होती. त्यातील आरोपींना अटकही करण्यात आली होती. मात्र पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. केंद्रीय तपास यंत्रणांकडून यासंबंधी चौकशी व्हावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली होती. तेव्हापासन त्यांना वारंवार धमक्या येत असल्याचंही नवनीत राणा यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.