Dipali Sayyad: घाबरलेला भोंगा महाराष्ट्राने पाहिला, कार्यकर्त्यांवर केसेस होणार, अमित ठाकरेंना लपवून ठेवणार; दिपाली सय्यद यांनी उडवली खिल्ली

Dipali Sayyad: केसेसला घाबरून स्वतःला हिंदुजननायक बोलून घेऊ शकतच नाही. तुम्ही जे प्रेम पत्र पाठवणार आहात. त्यात काय शिक्षण व नोकऱ्या देणार आहेत का? तुम्ही दौरा पुढे ढकलला म्हणजे सरळसरळ घाबरलेला दिसत आहात.

Dipali Sayyad: घाबरलेला भोंगा महाराष्ट्राने पाहिला, कार्यकर्त्यांवर केसेस होणार, अमित ठाकरेंना लपवून ठेवणार; दिपाली सय्यद यांनी उडवली खिल्ली
कार्यकर्त्यांवर केसेस होणार, अमित ठाकरेंना लपवून ठेवणार; दिपाली सय्यद यांनी उडवली खिल्लीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 22, 2022 | 2:26 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेRaj Thackeray) यांच्या सभेवर आता सत्ताधाऱ्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (dipali sayyad) यांनी तर राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली आहे. घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. शिवसेनेने (shivsena) झोप उडवली म्हणून आज सकाळी सकाळी सभा घेण्यात आली आणि घाबरलेला राज साहेबांचा भोंगा आज पूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. आजच्या सभेत लोकांनी काय बघितलं असेल तुम्ही घरा घरात पत्रक देणार आहात. नंतर आंदोलन होणार. कार्यकर्त्यांवर केसेस होणार पण अमित ठाकरेला लपवून ठेवणार, अशी खोचक टीकाही दिपाली सय्यद यांनी केली. दिपाली सय्यद यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

केसेसला घाबरून स्वतःला हिंदुजननायक बोलून घेऊ शकतच नाही. तुम्ही जे प्रेम पत्र पाठवणार आहात. त्यात काय शिक्षण व नोकऱ्या देणार आहेत का? तुम्ही दौरा पुढे ढकलला म्हणजे सरळसरळ घाबरलेला दिसत आहात. एमआयएम ही कुणाची पार्टी आहे. आणि कुणाची बी टीम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, असा टोलाही दिपाली सय्यद यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेच बोलतील

दरम्यान, संभाजी नगरच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बोलण्यास नकार दिला. राज ठाकरे या विषयावर आम्ही बोलणार नाही. त्या बाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलतील. औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालेलं आहे, लवकरच सरप्राईज मिळेल. 8 तारखेच्या सभेत उद्धव ठाकरे संभाजीनगर बाबत बोलतील, असं त्यांनी सांगितलं. तसेच औरंगाबादमध्ये मनसे आणि भाजपकडून काढण्यात येत असलेल्या मोर्चांवरही त्यांनी टीका केली. औरंगाबादेत भाजप मोर्चा काढणार आहे, त्याला पैसे देऊन लोक आणले जाणार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

अहमदाबादचं काय?

देशाच्या सरकारनेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची पोचपावती दिलेली आहे. कोरोना काळात सरकारने चांगला काम केलेलं आहे. जेवढी व्यवस्था महाराष्ट्रात झाली तेवढं कुठेही झालेली नाही. काय झालं त्याची काळजी तुम्ही करू नका. महाराष्ट्र सरकार सक्षम आहे. महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अशोक चव्हाण, अजित पवार आणि इतर नेत्यांनी मुकाबला केला. तुम्ही औरंगाबादचा नाव बदलण्यासाठी पंतप्रधान मोदींना सांगताय. पण गुजरातमध्ये अहमदाबाद संदर्भात काय ? मोदींना हे सांगा अहमदाबादचा नाव बदला ..इतिहास हा इतिहास असतो.. त्यावर चर्चा होऊ शकते. मात्र तुम्ही इतिहासाचे छेडछाड करू नका, असा सल्ला काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला.

राज वेगळा माणूस, पण कसे काय अडकले

आरएसएस जो एजेंडा चालविते, तो तुम्ही चालविणे योग्य नाही. लाऊडस्पीकर संदर्भात कायद्याप्रमाणे कारवाई झालेली आहे. मात्र घराघरात काय नेमकं काय? आरएसएसच्या गौडबंगालमध्ये राज ठाकरे कसे अडकले हे माहीत नाहीं. कारण ते मित्र आहेत आणि राज हा वेगळा माणूस आहे. भाजपा आणि आरएसएस त्यांचा वापर करून घेत आहे. भाजपाने सांगावं मुंबईसाठी काय केलं? आहे देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत करावी. देवेंद्र फडणवीस हे मुंबईचे वाटोळे करणारे व्यक्ती आहेत. मोदींना खुश करण्यासाठी बीकेसीमधला फायनान्स कॉल सेंटर गुजरातला हलवणारा हा माणूस. मुंबई स्मार्ट होणार होती. त्याचं काय झालं? देशात कुठला शहर स्मार्ट सिटी झालं?, असा सवाल त्यांनी केला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.