मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना ‘ब्रेक’, म्हणाले ‘उलटा चोर…, त्यांचे स्पीडबेकर…

कोरोना सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी डिक्लेअर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना 'ब्रेक', म्हणाले 'उलटा चोर..., त्यांचे स्पीडबेकर...
EKNATH SHINDE VS UDDHAV THACAKERAY Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 6:59 PM

मुंबई : गेले पंधरा वीस वर्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला. त्यामुळे दरोडा टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा करणे हे शोभत नाही. मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब विचारणार आहे. मुळात कोरोना सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याची एसआयटी चौकशी डिक्लेअर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जनतेला दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. परंतु, अशी कोणतीही दिशाभूल होणार नाही ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा हा विषय आहे. पण, ‘हमारी किताब खुली है’ अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय.

कोरोना सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यानुसार शिंदे सरकारने कोरोना सेंटर घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी चौकशी लावली आहे. एसआयटी आपले काम निपक्षपातीपणे करेल. कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन चौकशी होणार नाही. या चौकशीतून सगळं ‘दूध का दूध’ पाणी का पाणी’ समोर येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

खोडा आम्ही दूर केला

पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने थांबवलेले मेट्रो प्रकल्प आरक्षण प्रकल्प, एमटीएचएलचा प्रकल्प जो सगळ्यात महत्त्वाचा गेम चेंजर आहे. समृद्धी महामार्गमध्ये घातलेला रोडा, मुंबई पुणे सीलिंग ही सगळी कामे सुरु केली. मेट्रो ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. या सगळ्यांमध्ये खोडा घातला होता तो आम्ही आल्या आल्या दूर केला.

देवेंद्र फडणवीसजींनी हे सगळे स्पीड बेकर हटवले. जलयुक्त शिवार योजना आणि शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा विषय होता तो तुम्ही थांबवला हे सगळे प्रकल्प आम्ही सुरू केले. केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला. एसटीमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली.

बदल लोकांना दिसत आहे

राज्यात जो बदल घडतोय तो लोकांना दिसत आहे. म्हणूनच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते बेतालपणे काहीतरी बडबड करत आहेत. जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. मुंबईकरांचा जो पैसा आहे तो मुंबईकरांच्या तिजोरीत राहायला पाहिजे. तो कुणालाही इकडे तिकडे वळवता येणार नाही हीच भूमिका सरकारची आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

स्वाभिमानी दिवस, उठाव दिवस, क्रांती दिवस अनेक नावे दिलेली आहेत. पण, ही क्रांती आणि उठाव करायला देखील वाघाचं काळीज लागतं. G 20 याचं अध्यक्षपद आपल्या देशाला मिळणं हा आपल्या देश वासियांसाठी एक गौरव आणि अभिमानाची बाब आहे. देशाचं नाव जगभरामध्ये जी ट्वेंटीच्या माध्यमातून जातंय हे कसं यांना कळणार असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.