dengue : कोरोनानंतर आता मुंबईकरांवर आणखी एक संकट; डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

कोरोनानंतर आता मुंबईकरांना आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. तो म्हणजे डेंग्यू (dengue) गेल्या काही दिवसांमध्ये शहरात मोठ्या संख्येने डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

dengue : कोरोनानंतर आता मुंबईकरांवर आणखी एक संकट; डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 2:02 PM

मुंबई : मुंबईकराच्या चिंतेच भर टाकणारी बातमी आहे. मुंबई (Mumbai) व पूर्व उपनगरातील काही भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जून 2021 च्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. जून 2021 मध्ये डेंग्यूच्या एकूण 12 रुग्णांची नोंद झाली होती. तर चालू वर्षात जून महिन्यात आतापर्यंत हा आकडा तब्बल 33 वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) साप्ताहिक आरोग्य अहवालानुसार पावसाळ्यामध्ये जे साथिचे आजार पसरतात ते सर्व नियंत्रणात आहेत. मात्र मुंबईच्या काही भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेष: मुंबईच्या कन्नमवार नगर, टागोर नगर परिसरात डेंग्यूंचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याची माहिती बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. तसेच बॉम्बे हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. गौतम भन्साळी यांनी देखील रुग्णालयात येणाऱ्या डेंग्यू (dengue)आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

डेग्यूंची लक्षणे

तीव्र ताप हे डेंग्यूचे मुख्य लक्षणं आहे. सोबतच डोके दुखी, डोळे जळजळणे, डोळे दुखणे ही काही आणखी डेग्यूंची लक्षणे आहेत. डेग्यूमध्ये तोंडची चव जाते. तसेच भूक देखील नष्ट होते. भूक लागत नसल्याने रुग्ण अशक्त बनतो. रुग्ण अशक्त झाल्यास दुखणे अधिक बळावू शकते. सोबतच मळमळ आणि उलट्या ही देखील आणखी या आजाराजी काही लक्षणे आहेत. डेंग्यूमध्ये काही रुग्णांच्या त्वचेवर व्रण देखील उठतात. डेंग्यू हा आजार डासांपासून पसरतो. त्यामुळे आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापैकी कोणतेही लक्षण दिलल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. हा आजार अधिक बळवल्यास जीवघेणा देखील ठरण्याची शक्यता असते.

हे सुद्धा वाचा

डेग्यूंपासून बचावाचे उपाय

डेंग्यू हा एडीस इजिप्ती या जातीच्या डासाची मादी चावल्यास होतो. डेंग्यू हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट पसरत नाही, हा रोग केवळ संक्रमित डास चावल्यास होतो. या आजारापासून बचवासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, घरात कुठे सांडपणी साचत असेल तर सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे. पाणी एखाद्या भांड्यात किंवा टाकीमध्ये जास्त काळ साचून न ठेवणे, अशा साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. घरी झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा पद्धतीने आपण खबरदारी घेऊ शकतो.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.