जे जातात ते परत येतच नाहीत, भारतातील सर्वात खतरनाक स्थळे; माहिती वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही

तामिळनाडूचा कोल्ली हिल रोडही खरतनाक असल्याचं सांगितलं जातं. त्याचं कारण म्हणजे या रस्त्याची वळणं. डोंगर खोदून बनवलेला या रोडवर 70 बेंड आहेत.

जे जातात ते परत येतच नाहीत, भारतातील सर्वात खतरनाक स्थळे; माहिती वाचून तुमचाही विश्वास बसणार नाही
Tourist DestinationsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 7:57 AM

नवी दिल्ली: भारत हा सर्वात सुंदर असा देश आहे. निसर्गाने समुद्ध असा हा देश आहे. त्यामुळे आपल्या देशातील अनेक स्थळांना पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात. निसर्गाचा आनंद लुटत असतात. पण आपल्या देशात अशा काही जागा आहेत की तिथे जाणं मना आहे. कारण ही स्थळं अत्यंत खरतनाक मानली जातात. या ठिकाणी जे जातात ते परत येतच नाहीत, असं सांगितलं जातं. कारण यातील बरीचशी ठिकाणं निर्जनस्थळं आहेत. निर्जनस्थळ कोणतंही असो ते घातकच असतं. त्यामुळे तुम्हीही अशा ठिकाणी जाणार असाल तर खबरदारी घेऊनच जा. कुणाला तरी सांगून जा. नाही तर शक्यतो अशा निर्जनस्थळी जाणं टाळाच.

बीच सुंदर पण…

गुजरातच्या सूरतमध्ये दमास बीच प्रसिद्ध आहे. या बीचवर मावळत्या सूर्याला पाहण्याचा आनंद हा वेगळाच आहे. पण या ठिकाणी रात्री फिरण्यास मनाई आहे. रात्रीच्यावेळी ही जागा अत्यंत खतरनाक असल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणाहून रात्रीच्यावेळी अनेक लोक गायब झाल्याचं सांगितलं जातं.

हे सुद्धा वाचा

तापमान असे की…

लडाखच्या खारदुंग ला येथे जाणं म्हणजे हिंमतीचं कामच आहे. खारदुंग ला जितकं सुंदर आहे. तितकच खरतनाकही आहे. कारण या ठिकाणी किमान तापमान मायनस 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. त्यामुळे जीवाला धोका संभवू शकतो. म्हणून ही जागा पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक मानली जाते.

शापित गाव

राजस्थानच्या कुलधरा बाबत अनेक दंतकथा आहेत. कुलधरा हे गाव जैसलमेरच्या वाळवंटातील छोटसं गाव आहे. आधी या गावात लोक गुण्यागोविंदाने राहत होते. पण अचानक लोक रातोरात हे गाव सोडून गेले. लोक हे गाव का सोडून गेले हे कुणालाच माहीत नाही. पण ही जागा शापित असल्याचं काही लोक मानतात.

खतरनाक वळणांचा रस्ता

तामिळनाडूचा कोल्ली हिल रोडही खरतनाक असल्याचं सांगितलं जातं. त्याचं कारण म्हणजे या रस्त्याची वळणं. डोंगर खोदून बनवलेला या रोडवर 70 बेंड आहेत. या मार्गावर एक रहस्यमयी मुलगी लोकांना ठार करते असं सांगितलं जातं. तसेच या डोंगरावर एक वेगळीच प्रतिमा पाहायला मिळाली. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना लोक घाबरतात.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.