Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 23, 2023 | 6:01 AM

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra News Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई: सोमवारी 23 जानेवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होणार आहे. त्यावर आज राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे. तर, आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक भारतीची नाशिक पदवीधरचे उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा. अंनिसचे उपाध्यक्ष श्याम मानव यांची बागेश्वर बाबांना अटक करण्याची मागणी.यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींची अपडेट जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jan 2023 11:54 PM (IST)

    कुर्ल्यात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी

    कुर्ल्यात भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु

  • 22 Jan 2023 08:47 PM (IST)

    अंबरनाथ एमआयडीसीत कंपनीला लागली आग

    अंबरनाथ एमआयडीसीत कंपनीला लागली आग

    कामत लॅबोरेटरीज कंपनीला शॉर्टसर्किटने लागली आग

    अंबरनाथ आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी दाखल

    आगीवर नियंत्रण मिळवत कुलिंग ऑपरेशन सुरू

  • 22 Jan 2023 08:16 PM (IST)

    शिवसेना – वंचित आघाडीची युती होणार?

    शिवसेना आणि वंचित आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद

    उद्या साडेबारा वाजता मुंबईत होणार पत्रकार परिषद

    दादरमधल्या आंबेडकर भवनात होणार पत्रकार परिषद

    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद

    उद्या ठाकरे गट आणि वंचित आघाडी यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता

  • 22 Jan 2023 06:52 PM (IST)

    सोलापूर : 10 वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू

    सोलापूरमध्ये चिमुकल्याचा डंपरखाली चिरडून अपघाती मृत्यू

    छत्रपती सांभाजी महाराज चौकातील घटना

    श्रीपाद पवन कवडे असे मृत मुलाचे नाव आहे

    श्रीपाद हा अवघ्या दहा वर्षाचा असून आईसोबत जात होता

    डांबरमिश्रित खडी वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडून हा अपघात झाला

    अपघातानंतर बराचवेळ वाहतूक खोळंबली होती

  • 22 Jan 2023 06:34 PM (IST)

    तिवसा येथे धरणाचे पाणी वस्तीत शिरले

    अमरावतीच्या तिवसामधील सुरवाडीनजीक लघु कालव्याच्या मायनरचे पाणी शिरले वस्तीत

    सुरवाडी येथून गेलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या लघु कालव्याचा मायनर ओव्हरफ्लो होऊन शिरले थेट वस्तीत

    मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला

    गावात पूर आला असे चित्र निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली

  • 22 Jan 2023 05:20 PM (IST)

    पुण्यात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु

    पुणे :

    कसबा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही

    पुण्यात काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु

    भवानी पेठेतील काँग्रेस कार्यालयात ही बैठक सुरु

  • 22 Jan 2023 04:14 PM (IST)

    कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक

    कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच

    दोन्ही जागांवरती महाविकास आघाडी उमेदवार देणार

    निवडणुकीच्या‌ तयारीबाबत लवकरच महाविकास आघाडीची बैठक

    चिंचवडची जागा राष्ट्रवादी तर कसबापेठची‌ जागा काँग्रेस लढणार

    काँग्रेसकडून रोहित टिळक, अरविंद शिंदे यांची नावे चर्चेत

    तर चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत

  • 22 Jan 2023 04:12 PM (IST)

    कसबा विधानसभा पोटनिवडणूक

    कसबा विधानसभा पोटनिवडणूक संभाजी ब्रिगेड लढवणार

    आज पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडचा निर्धार

    कसबा आमच्या हक्काचा आहे आम्ही निवडणूक लढवणार

    संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांची माहिती

  • 22 Jan 2023 03:17 PM (IST)

    श्रद्धा हत्या प्रकरणात तीन हजार पानांचे आरोपपत्र

    श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तीन हजार पानांचे आरोपपत्र तयार केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे….वाचा सविस्तर

  • 22 Jan 2023 03:15 PM (IST)

    मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे प्रथमच आले फोटो

    नितीन गडकरी यांनी शेअर केले दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे चे फोटो

    बडोदा ते विरार दरम्याने द्दश्य आहेत फोटोमध्ये

    मुंबई-दिल्ली प्रवास फक्त 12 तासात प्रवास होणार सुसाट

  • 22 Jan 2023 03:14 PM (IST)

    IND vs NZ ODI Series- टीम इंडियाने एका विजयात न्यूझीलंडला दिले 3 धक्के, किवींनी मानाच स्थान गमावलं

    IND vs NZ ODI Series- टीम इंडियाने या विजयाने न्यूझीलंडच्या सर्वोच्च स्थानाला सुरुंग लावला. भारताकडे चार वर्षानंतर मोठी संधी आहे. वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 02:25 PM (IST)

    कोण शाहरुख? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शाहरुख खानने रात्री 2 वाजता केला कॉल

    ‘पठाण’विरोधात गुवाहाटीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं

    निदर्शनाविषयी प्रतिक्रिया विचारलं असता आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, “कोण शाहरुख खान?”

    या वक्तव्यानंतर शाहरुखने केला मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमाला कॉल, वाचा सविस्तर..

  • 22 Jan 2023 02:12 PM (IST)

    नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रंगत सुरू

    ठाकरे गटाच्या वतीने मतदार याद्या तपासणीचे काम सुरू

    मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार विलास पोतनीस हे नाशिकमध्ये तळ ठोकून

    जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचे आव्हान

    तालुका, जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना तयारीच्या सूचना

    नाशिक ठाकरे गट सर्वार्थाने शुभांगी पाटील यांच्या प्रचारात सहभागी

  • 22 Jan 2023 01:56 PM (IST)

    Sarfaraz Khan -‘अब्बू अर्जुनच नशीब किती…’ सर्फराजच्या वडिलांनी सांगितली ‘ती’ आठवण

    सर्फराज माझ्याजवळ आला व निरागसपणे मला बोलला, ‘अब्बू….’ वाचा सविस्तर…..

  • 22 Jan 2023 01:55 PM (IST)

    VIDEO – 46 बॉलमध्ये सेंच्युरी, दोन दिवसात दुसरं शतक, 178 धावांच टार्गेट ठरलं फुसका बार

    कितीही मोठं टार्गेट द्या, फरक पडत नाही. वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 01:54 PM (IST)

    Mohammed Siraj चा मोठा रेकॉर्ड, जसप्रीत बुमराह-शाहीन शाह आफ्रिदी जवळपासही नाही

    न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या वनडे मॅचमध्ये दमदार बॉलिंग करुन सिराजने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. वाचा सविस्तर…

  • 22 Jan 2023 01:53 PM (IST)

    Shoaib Akhtar – शोएब अख्तरची सटकली, स्वत:च्या बायोपिकबद्दल घेतला मोठा निर्णय

    Shoaib Akhtar ने सोशल मीडियावर स्वत:च्या बायोपिकबद्दलचा निर्णय जाहीर केलाय. वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 01:41 PM (IST)

    शहाजीबापू पाटील आणि सुजय विखे पाटील यांची गळाभेट

    शहाजीबापू पाटील आणि सुजय विखे पाटील यांची गळाभेट

    गडाख-घुले विवाहसोहळ्यादरम्यान दोन नेत्यांची गळाभेट

    सुजय यांना भेटून आनंद झाला, शहाजीबापूंची प्रतिक्रिया

  • 22 Jan 2023 12:02 PM (IST)

    Entertainment News Live: केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाची धामधूम

    केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात

    सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये पार पडणार लग्न, वाचा सविस्तर 

  • 22 Jan 2023 11:53 AM (IST)

    Entertainment News Live: 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात नोरा फतेहीबाबत सुकेश चंद्रशेखरचा मोठा खुलासा

    वकील अनंत मलिक आणि एके सिंग यांच्यामार्फत सुकेशने जारी केलं पत्र

    नोराने जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात माझा ब्रेनवॉश केला, सुकेशचा आरोप- वाचा सविस्तर

  • 22 Jan 2023 11:45 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे भांडुपमध्ये दाखल

    राज ठाकरे यांच्या हस्ते भांडुप येथील एसआरए प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार

    या भूमिपूजनासाठी राज ठाकरे हे भांडुपमध्ये दाखल झाले आहेत

    राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

  • 22 Jan 2023 10:13 AM (IST)

    मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे काँग्रेच्या पाया पडले- दिपक केसरकर

    मुख्यमंत्री पदासाठी कुणी काय केलं याचा लवकरच खुलासा करणार- केसरकर

    काश्मिरमध्ये काँग्रेसला जाऊन भेटणे हा बाळासाहेबांचा अपमाण

  • 22 Jan 2023 10:07 AM (IST)

    VIDEO – 6,2,4,1,6,6, लास्ट ओव्हरमध्ये बेकार धुतलं, शेवटच्या चेंडूवर Mumbai Indians चा रोमहर्षक विजय

    ड्वेन ब्राव्हो-नजीबुल्लाह जादरानचा धूमधडाका, आंद्रे रसेलची वाट लावली. वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 10:06 AM (IST)

    Rohit Sharma कडून फॉर्ममध्ये असलेल्या दोन खेळाडूंना तिसऱ्या ODI साठी टीममध्ये स्थान न देण्याचे संकेत

    IND vs NZ: Rohit Sharma फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूसोबत असं का करतोय? वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 09:49 AM (IST)

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार, अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी निधन

    चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय होते टेमुर्डे

    1991ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात 2 वेळेस वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व

    1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते

    टेमुर्डे यांचा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या उभारणीत होता मोठा वाटा

    राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध होते

    त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे

    त्यांचे पार्थिव वरोरा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले

    त्यांच्या इच्छेनुसार मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला सोपविण्यात येणार

  • 22 Jan 2023 09:45 AM (IST)

    रेल्वेच्या सोलापूर विभागात फुकट्या प्रवाशांना लागला ‘रेल्वे’चा ब्रेक

    तिकीट तपासणी मोहिमेतून तब्बल 32 कोटी 7 लाखांची वसुली

    मध्य रेल्वे विभागात सोलापूर रेल्वे विभागाने विविध मोहिमेतून160 कोटींची बचत केली

    यात तिकीट तपासणी मोहिमेतून तब्बल 32 कोटी 7 लाखांची वसुली केली

    मागच्या वर्षीपेक्षा यंदा 133 टक्के अधिक आर्थिक बचत झाल्याची माहिती रेल्वेने दिली

    सोलापूर रेल्वे विभागाची नुकतीच वार्षिक आढावा बैठक झाली असून, वार्षिक मोहिमांचा आढावा घेण्यात आला

    सर्वच मोहिमेत रेल्वेने मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केली आहे

  • 22 Jan 2023 09:05 AM (IST)

    गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी आणखी एका एजंटाला अटक

    कोल्हापुरातील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण

    आणखी एका एजंटाला अटक

    सर्जेराव अशोक पाटील असं एजंटचं नाव आहे

    गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी आतापर्यंत सहा संशयतांना अटक करण्यात आली आहे

    दोन दिवसापूर्वी एकाच वेळी चार ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी गर्भलिंग निदान चाचणीच्या टोळीचा पर्दाफाश केला होता

    चौकशी दरम्यान समोर आलेल्या आणखी काही एजंट्सचा शोध सुरूच

  • 22 Jan 2023 08:50 AM (IST)

    पुण्यात आज हिंदू संघटनांचा हिंदू जन आक्रोश मोर्चा

    पुण्यात आज हिंदू संघटनांचा हिंदू जन आक्रोश मोर्चा

    मोर्चाल मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी होण्याची शक्यता

    गोहत्या, धर्मवीर दिन , लव्ह जिहाद विरोधात आज निघणार मोर्चा

    लाल महाल ते डेक्कन परिसरातील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा निघणार आहे

  • 22 Jan 2023 08:46 AM (IST)

    IND vs NZ – Virat Kohli फॉर्ममध्ये आहे, सेंच्युरी मारतोय पण अजूनही एका बॉलरसमोर त्याचं काहीच चालत नाहीय

    IND vs NZ – Virat Kohli बॅकफूटवर खेळून पण फेल, फ्रंटफुटवर खेळून पण फेल, कोहली कसं सोडवणार कोडं? वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 08:45 AM (IST)

    लाइव्ह मॅचमध्ये रोहित शर्माचा झाला ‘गजनी’, सगळेच हैराण

    न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम आणि रवी शास्त्री रोहितच्या तोंडाकडे पाहत बसले. वाचा सविस्तर…

  • 22 Jan 2023 08:45 AM (IST)

    शेफाली-ऋचा फेल, टीम इंडियाचा पहिला पराभव,ऑस्ट्रेलियाकडून मात

    ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या विजयी रथाला ब्रेक लागला आहे. वाचा सविस्तर….

  • 22 Jan 2023 08:41 AM (IST)

    आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

    आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे भाव स्थिर

    मुंबईमध्ये आज पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर

    अहमदनगर पेट्रोल 106.85 रुपये, अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये प्रति लिटर

    अमरावतीत 107.14, औरंगाबाद 107.02, नागपूरमध्ये 106.03 रुपये प्रति लिटर

    नांदेड 108.50, जळगावमध्ये 106.42, नाशिकमध्ये 106.51 रुपये प्रति लिटर

    लातूरात 107.38, कोल्हापूरात 107.45, पुण्यात पेट्रोल 106.85 रुपये प्रति लिटर

    सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये प्रति लिटर

  • 22 Jan 2023 08:21 AM (IST)

    Entertainment News Live: कोण शाहरुख खान? त्याला नाही ओळखत, मुख्यमंत्र्यांच मोठं विधान

    बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आसाममधल्या नरेंगी इथल्या थिएटरबाहेर पठाण चित्रपटाच्या विरोधात घोषणाबाजी

    आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांना प्रश्न विचारला असता म्हणाले, ‘कोण शाहरुख खान?’, वाचा सविस्तर

  • 22 Jan 2023 07:12 AM (IST)

    प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील कात्रज परिसरात पकडले बनावट तूप

    300 किलो तूप पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या केलं हवाली

    नाशिकहून स्कोडा गाडीत 17 डब्बे विक्रीसाठी आणण्यात आले होते

    अन्न व औषध प्रशासन विभागाकडूनही यावर कारवाई करण्यात आली आहे

    भारती पोलीस पुढील तपास करत आहेत

  • 22 Jan 2023 06:13 AM (IST)

    जळगाव शहरात पोलिसांची अचानक नाकाबंदी

    शहरातील प्रत्येक चौकात करण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान दुचाकी आणि चार चाकीची पोलिसांकडून करण्यात आली तपासणी

    अचानक पोलिसांकडून तपासणी केली जात असल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ

    नाकाबंदी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक स्वतः उतरले रस्त्यावर

    तर नाकाबंदी दरम्यान नियम मोडणाऱ्या वाहनांवर पोलिसांकडून कार्यवाही

  • 22 Jan 2023 06:10 AM (IST)

    समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

    कोलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    अबू आझमीच्या पीएला धमकीचा फोन आला आणि औरंगजेबबाबत केलेल्या विधानाबाबत मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या

    औरंगजेबचा कथित समर्थन केल्या संदर्भात अबू आझमीला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली

    त्यानंतर या प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

    तक्रार मिळाल्यानंतर मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी भादंवि कलम 506(2) आणि 504 अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे

  • 22 Jan 2023 06:07 AM (IST)

    ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत भारत-पाक सीमेवर

    आपल्या जम्मू दौऱ्यात संजय राऊत यांनी काल सायंकाळी सूचेतगड येथील भारत – पाकिस्तान सीमेला भेट दिली

    शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती संजय राऊत यांच्या जम्मू दौऱ्यावर टीका

    संजय राऊत हे जम्मूला गेले आहेत तर त्यांनी पुढे पाकिस्तानातही जावं, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली होती

    संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्या टीकेला थेट भारत – पाक सीमेवर जाऊन दिले उत्तर

    सूचेतगड येथील भारत सीमेवरून पाकिस्तानातील सियालकोट 11 किलोमीटर, तर लाहोर 141 किलोमीटर अंतरावर

  • 22 Jan 2023 06:04 AM (IST)

    एका वर्षात अमरावती शहरातील एक लाख वाहन चालकांनी मोडले वाहतुकीचे नियम

    वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी 6 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल

    अमरावती पोलिसांच्या शहर वाहतूक पोलीसांनी केली कारवाई

    16 हजार केसमधील मधील वाहनचालकांनी भरला दंड

  • 22 Jan 2023 06:02 AM (IST)

    वसई तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार

    ठाकरे गटाचे 100 च्यावर पदाधिकाऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षाप्रवेश

    शिवसेना ठाकरे गटाचे वसई पूर्व गोखीवरे विभागातील धनंजय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली 100 च्या वर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल केला पक्षप्रवेश

Published On - Jan 22,2023 5:59 AM

Follow us
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.