GK Quiz | कोणत्या देशात एकही वृत्तवाहिनी नाही?
मानवाने प्रथम कोणती फळे खाल्ली? कोणत्या प्राण्याला तीन पापण्या असतात? पंख्याचा शोध कधी लागला?
मुंबई: जनरल नॉलेज हा खूप महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला गणित येत असलं किंवा नसलं. विज्ञान येत असलं किंवा नसलं तुम्हाला जनरल नॉलेज असायलाच हवं. हे ज्ञान वाचनातून येतं. जितकं वाचन चांगलं तितकं जीके चांगलं. हे का महत्त्वाचं आहे? बऱ्याच सरकारी परीक्षा किंवा मोठमोठ्या परीक्षा असतात ज्यात अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मग यावर विद्यार्थ्यांची, उमेदवारांची क्षमता ठरते. यासाठी आपलं वाचन चांगलं असायला हवं, पेपर रोज वाचायला हवा वगैरे वगैरे गोष्टी आपण लहानपणापासून ऐकलेल्या असतात. चालता चालता रोज थोडे प्रश्न उत्तरे वाचले तरीही आपल्या ज्ञानात भर पडते असं म्हणायला हरकत नाही. चला तर मग काही प्रश्न पाहुयात, याची उत्तरे तुम्हाला आली तर उत्तम, नाही आली तरीही हरकत नाही पुढच्यावेळी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे माहिती असणारच.
प्रश्न 1 – कोणत्या प्राण्याला तीन पापण्या असतात?
उत्तर 1 – उंटांना तीन पापण्या असतात.
प्रश्न 2 – ताजमहाल किती वर्षांत पूर्ण झाला?
उत्तर 2- ताजमहाल 22 वर्षांत पूर्ण झाला.
प्रश्न 3 – सर्वात मेहनती प्राणी कोणता?
उत्तर 3 – सर्वात मेहनती प्राणी मुंगी.
प्रश्न 4 – सर्वाधिक शेळ्या कोणत्या राज्यात आढळतात?
उत्तर 4 – सर्वाधिक शेळ्या उत्तर प्रदेशात आढळतात.
प्रश्न 5 – पंख्याचा शोध कधी लागला?
उत्तर 5 – पंख्याचा शोध 1882 मध्ये शूयलर स्काट्स व्हीलर यांनी लावला
प्रश्न 6 – कोणत्या देशाने पहिल्यांदा कागदी चलन जारी केले?
उत्तर 6 – ज्या देशाने पहिल्यांदा कागदी चलन जारी केले तो देश म्हणजे चीन
प्रश्न 7 – कोणत्या देशात एकही वृत्तवाहिनी नाही?
उत्तर 7 – ग्रीस हा असा देश आहे जिथे एकही वृत्तवाहिनी नाही.
प्रश्न 8 – भारतातील कोणत्या राज्यात उंदीर मंदिर आहे?
उत्तर 8 – करणी माता मंदिर हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे.
प्रश्न 9 – मानवाने प्रथम कोणती फळे खाल्ली?
उत्तर 9 – पृथ्वीवर खजूर सर्वप्रथम मानवाने खाल्ले.