तुमचे मुले लॉंग कोविडमध्ये तर सापडली नाहीत ना? जाणून घ्या, काय आहेत लहान मुलांची कोरोनाची लक्षणे !

आपल्या मुलाला लॉंग कोविड तर झाला नाही ना ? लहान मुलांमध्ये मध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली आहेत. आपण आपल्या मुलांना तर, हा लॉंग कोविड झाला नाहीय ना, काय आहेत त्याची लक्षणे जाणून घ्या सविस्तर माहिती.

तुमचे मुले लॉंग कोविडमध्ये तर सापडली नाहीत ना? जाणून घ्या, काय आहेत लहान मुलांची कोरोनाची लक्षणे !
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 2:32 PM

कोरोना संसर्गांमुळे (Due to corona infections) आज संपूर्ण जग वाईट अवस्थेतून जात आहे. या विषाणूने गेल्या काही वर्षांत कोट्यवधी लोकांचा बळी घेतला आहे, तर आजही कोट्यवधी लोक त्याच्या विळख्यात आहेत. भारतात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. असे दिसून आले आहे की, काही लोकांना दीर्घकाळ कोरोनाशी सं714326बंधित लक्षणांचा सामना करावा लागत आहे. याला लाँग कोविड असेही म्हणतात आणि याचा परिणाम केवळ वृद्धांवरच नाही तर लहान मुलांवरही (Even on small children) होतो. ही परिस्थिती गंभीर चिंतेचे कारण आहे. लाँग कोविड अजून नीट समजू शकलेले नाही, पण त्याचा त्रास झालेल्या व्यक्तीला दीर्घकाळ शारीरिक आणि मानसिक समस्यांना (Mental problems) तोंड द्यावे लागत आहे. हाती आलेल्या रीपोर्टनुसार, लाँग कोविड प्रभाव लहान मुलांवर अधिक पाहायला मिळत आहे.

लवकर थकवा येणे

तज्ञांच्या मते मुलाला खुप वेळ थकल्यासारखे किंवा नाराज वाटत आहे, तर तो लॉंग कोविड मध्ये असू शकतो. शरीरात अशक्तपणा आहे आणि तो पुनर्प्राप्त करण्यात वेळ लागतो. कारण कोविड मध्ये असलेल्या मुलांची संपूर्ण ऊर्जा लवकर नाश पावते. फार पटकन थकल्यासारखे वाटते.

हे सुद्धा वाचा

डोकेदुखी

मुलांचे डोके दुखणे हे लॉंग कोविड चे लक्षण आहे. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर मूड स्विंगची समस्या जाणवते. मुलांमध्ये इतरांपेक्षा या समस्या अधिक सामान्य आहेत. डोकेदुखी असलेल्या मुलांना मूड स्विंग होत असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा.

हृदयाची समस्या

कधीकधी दीर्घ कोविडच्या परिस्थितीत, लहान मुलाला देखील हृदयाशी संबंधित समस्या येऊ लागतात. तज्ञांचा असा विश्वास आहे की दीर्घ काळ कोविड, जो शरीरावर सतत परिणाम करतो, मुलांच्या हृदयाच्या गतीला देखील त्रास देतो. अशा स्थितीत मूल शारीरिक हालचाली करण्यास कचरते. त्याला चालणे अवघड होऊन बसते आणि त्यामुळे मुलांच्या शाळेच्या प्रगतीवरही परिणाम होतो.

प्रतिकार शक्ती कमी

पूर्वी कोविड-19 ची लागण झालेली मुले इतर प्रकारच्या संसर्गाच्या जाळ्यात येत आहेत. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. लहान मुलांना सतत ताप, सर्दी, खोकल्याच्या समस्या वारंवार होत असल्यास, त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोविड-19 ने संक्रमीत झालेली मुले नंतरही डेंग्यू आणि न्यूमोनियाच्या तक्रारी घेऊन दवाखान्यात दाखल होत आहेत.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.