दृष्टी चांगली होण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा?
आजकाल लहान मुलांना सुद्धा चष्मा लागलेला आपल्याला दिसतो. डोळे चांगले राहावेत म्हणून लहानपणापासूनच काळजी घ्यायला हवी. डोळ्यांची निगा राखायलाच हवी. आपण जे खातो त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. आपण जे खाणार त्याचा परिणाम नक्कीच आपल्या दृष्टीवर देखील होणार. चला तर बघूया चांगल्या दृष्टीसाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.
मुंबई: डोळे कमकुवत होण्याची समस्या आजकाल लहान मुलांना पण आहे. यामुळे लहान वयातच चष्मा लावावा लागतो आणि कधी कधी त्यांना त्याचा त्रास होतो. तसे पाहिले तर डोळे कमकुवत होणे ही काही नवीन गोष्ट नाही. कधी निष्काळजीपणामुळे ते कमकुवत होतात, तर कधी अनुवांशिकतेमुळे असं होऊ शकतं. अशावेळी नुसते औषध घेणे पुरेसे नाही, जेवणात थोडी सावधगिरी बाळगली तर लहान वयातच चष्मा लावण्याची गरज भासणार नाही.
आपले डोळे कमकुवत का होतात?
एका अभ्यासानुसार शरीरात झिंक, कॉपर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि बीटा कॅरोटीनची कमतरता हे दृष्टी कमी होण्यामागचे प्रमुख कारण आहे. याची भरपाई करण्यासाठी जेवणात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, झेक्सॅन्थिन, ल्युटिन आणि बीटा कॅरोटीन आदींचा समावेश केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
हे पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांची दृष्टी वाढेल
1. व्हिटॅमिन A समृद्ध पदार्थ
व्हिटॅमिन ए युक्त पदार्थ डोळ्यांसाठी फायदेशीर असतात. व्हिटॅमिन ए मध्ये रोडोप्सिन असते. हे एक प्रथिने आहे जे आपल्या डोळ्यांना कमी प्रकाशात देखील पाहण्यास मदत करते. यामुळे तुमची दृष्टी वाढण्यास मदत होते. गाजर, भोपळा, पपई आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
2. व्हिटॅमिन B1 आणि E असलेले पदार्थ
व्हिटॅमिन B1 समृद्ध असलेले पदार्थ तणावविरोधी पदार्थ आहेत. ते तणावाच्या प्रभावापासून डोळ्यांचे रक्षण करतात आणि कोरडेपणा आणि जळजळ होण्याची समस्या कमी करतात. व्हिटॅमिन E डोळ्यांसाठी देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण आपल्या आहारात वाटाणा, शेंगदाणे, काजू, बदाम आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करा.
3. आंबट फळे
दृष्टी वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय फळांचे सेवन फायदेशीर ठरते. त्यामध्ये Vitamin C भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये Vitamin E आणि खास अँटीऑक्सिडंट्स असतात. ते डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यास मदत करतात. याची पूर्तता करण्यासाठी लिंबू आणि संत्रा सारख्या फळांचा आहारात समावेश करावा.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)