The Kerala Story फेम अदा शर्मा हिने गायली शाळेत शिकवलेली मराठी कविता; चाहते म्हणाले…

'कसं वाटलं....', अभिनेत्री अदा शर्मा शाळेत शिकलेली मराठी कविता गाते तेव्हा...; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले..., सध्या सर्वत्र अदा शर्मा हिच्या व्हिडीओची चर्चा

The Kerala Story फेम अदा शर्मा हिने गायली शाळेत शिकवलेली मराठी कविता; चाहते म्हणाले...
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 2:20 PM

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. सिनेमाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी मजल मारली. यंदाच्या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा देखील अव्वल स्थानी आहे. ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडियावर देखील अदा हिच्या चाहत्यांची सख्या फार मोठी आहे. अदा सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अदा शर्मा हिने आता पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शाळेतील आठवणी ताज्या केल्या आहेत. अदा शर्मा हिने शाळेत शिकवलेली मराठी कविता चाहत्यांना ऐकवली आहे. सध्या अदा हिने पोस्ट केलेला कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

अदा शर्मा कविता पोस्ट करत म्हणाली, ‘इडली आणि चवळी चटक नंतर लोकांच्या मागणीवरून मी शाळेत शिकलेली दुसरी मराठी कविता…कसं वाटलं?’ मॅगझिनच्या कव्हर शूटच्या लंच ब्रेक दरम्यान अदा शर्मा हिने व्हिडीओ शूट केला आहे. चाहत्यांना देखील अदा शर्मा हिने गायिलेली कविता फार आवडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदा शर्मा कवितेवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाली, ‘मराठी मुलगी…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मस्त वाटलं…’ अशा अनेक प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर येत आहेत. सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अदा शर्मा हिच्या कवितेची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अदा हिने तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना महत्त्वाची माहिती दिली होती. अदा हिला फूड पॉयझनिंग आणि डायरियाचा त्रास होऊ लागल्याने तिची तब्येत खूपच बिघडली होती. त्यामुळे उपचारांसाठी तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. पण आता अदा हिची प्रकृती स्थिर आहे.

अदा शर्मा हिच्या बॉलिवूड प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘1920’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्रीने ‘हम हैं राही प्यार के’ ‘हर्ट अटॅक’, ‘हंसी तो फंसी’ ‘कमांडो-2’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूनिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अदा शर्मा बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे.

Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.