‘जाड मुलीला कोण काम देतं, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध…’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
लोकांच्या मानसिकतेवर प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी; मुख्य भूमिका मिळाल्यानंतर अनेक जण अभिनेत्रीला म्हणाले, 'दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध..'
मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना कराला लागला.. ‘तू जाड आहेत, तुला अभिनय क्षेत्रात काम करता येणार नाही…’ असं देखील अनेकदा अभिनेत्रींना त्याच्या शरीरावरुन ऐकावं लागलं. पण बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिला आलेल्या अनुभवाबद्दल स्पष्ट सांगितलं आहे. अभिनेत्री अंजली आनंद हिने ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण केलं आहे. सिनेमात अंजली हिने गायत्री या भूमिकेला न्याय दिला आहे. प्रेक्षकांनी देखील अंजलीच्या भूमिकेला डोक्यावर घेतलं. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्रीला तिच्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अंजली हिने मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. ‘पूर्वी जाड लोकांना सिनेमा किंवा मालिकेत फक्त खाण्याची भूमिका द्यायचे. एक जाड मुलगी फ्रेंच फ्राईज किंवा बर्गर खाताना दिसत असते. तिच्या तोंडातून पदार्थ पडत असल्याचं देखील मोठ्या पडद्यावर अनेकदा दाखवण्यात आलं..’
पुढे अंजली म्हणाली, ‘बदलत्या काळानुसार आता लोकांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आता जाड माणसाला सर्व वेळ फक्त खाताना दाखवू नये.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. करण जोहर याच्या सिनेमात भूमिका साकराण्याआधी अंजली हिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
अंजली हिने १० वर्षांपूर्वी एका ऍक्टिंग स्कुलमध्ये प्रवेश घेतला होता. तेव्हा तू अभिनेत्री होवू शकत नाही.. असं अभिनेत्रीला अनेकांनी सांगितलं. १० वर्षांपूर्वीचं अंजली हिने अभिनयच आपलं भविष्य असल्याचं ठरवलं होतं. अशात अंजली कोणतीही भूमिका साकारण्यासाठी तयार होती.
झगमगत्या विश्वात स्वतःची ओळख तयार करत असताना एका मालिकेत तिला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तेव्हा जाड असताना हिला मुख्य भूमिका कशी मिळाली अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागली होती.
यावर अभिनेत्री म्हणाली, ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून मला अनेकांनी ट्रोल केलं आणि म्हणाले ‘जाड मुलीला कोण काम देतं, दिग्दर्शकासोबत शारीरिक संबंध ठेवले असतील.. मला कळत नाही लोक इतका वाईट विचार कसा करु शकतात? ‘
‘फक्त लठ्ठ आहे म्हणून मुलगी पुढे जाऊ शकत नाही का? लोकांची अशी मानसिकता बदलण्याची गरज आहे.’ असं देखील अंजली म्हणाली.. अंजली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंजली कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.