केदार शिंदेंचा ‘बाईपण भारी देवा’ या दिवशी होणार प्रदर्शित; चित्रपटात सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची कथा

काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि त्याचबरोबर कौटुंबिक, वैयक्तिक तसंच आर्थिक समस्या अशा गोष्टींचा सामना करणाऱ्या सहा बहिणींची ही कथा आहे.

केदार शिंदेंचा 'बाईपण भारी देवा' या दिवशी होणार प्रदर्शित; चित्रपटात सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची कथा
केदार शिंदेंचा 'बाईपण भारी देवा' या दिवशी होणार प्रदर्शितImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 8:22 AM

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) आपल्या सर्वसामान्य आयुष्यातील सुपरवुमनची सुपर कथा ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. हा चित्रपट 6 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होईल. आई, आजी, पत्नी, बहीण, सासू, मावशी..आपल्या आयुष्यात असलेल्या या सर्व जीवाभावाच्या मैत्रिणींना समर्पित असलेला असा हा चित्रपट आहे. ‘घे डबल’ आणि ‘गोदावरी’ या दोन मराठी चित्रपटांच्या घोषणेनंतर जिओ स्टुडिओजने त्यांच्या सलग तिसऱ्या चित्रपटची, ‘बाईपण भारी देवा’च्या प्रदर्शनाची तारीख (Release Date) जाहीर केली आहे. या चित्रपटाची निर्मिती MVB Media च्या माधुरी भोसले यांनी केली असून बेला शिंदे आणि अजित भुरे याचे सह-निर्माते आहेत. महत्वाचं आकर्षण म्हणजे या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, दीपा परब, शिल्पा नवलकर आणि सुचित्रा बांदेकर अशा सहा उत्तम कलाकारांची धमाल प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त झालेल्या आणि त्याचबरोबर कौटुंबिक, वैयक्तिक तसंच आर्थिक समस्या अशा गोष्टींचा सामना करणाऱ्या सहा बहिणींची ही कथा आहे. चित्रपटाच्या संकल्पनेबद्दल बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे सांगतात, “आपल्या सर्वांच्या दररोजच्या आयुष्यात अशा स्त्रिया आहेत ज्या अशा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात, परंतु आपणच कळत नकळतपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो. ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट अशाच महिलांना समर्पित आहे. या सहा बहिणींची ही गोष्ट सर्वांना नक्कीच आवडेल. आणि नवीन वर्षाची सुरुवात एका आशादायी आणि आनंदाने होईल याची मला खात्री आहे.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

“आई, आजी, बहिण, पत्नी, मुलगी, काकू, आत्या, मावशी… अशी अनेक जिव्हाळ्याची नाती. मी सुज्ञ झालो तो यांच्याच संस्काराने. ‘अगं बाई अरेच्चा’ सिनेमा करताना स्त्रीयांच्या मनातल्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न केला. आणि ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमात त्यांच्या अंतर्मनात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे”, अशी पोस्ट त्याने चित्रपटाची घोषणा करताना लिहिली होती.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.