Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू, ब्रेन डेड अवस्थेत

डॉक्टरांची एक टीम राजू यांच्यावर उपचार करत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यापासून राजू हे अद्याप शुद्धीवर आले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना हलका तापसुद्धा होता. त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे.

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू, ब्रेन डेड अवस्थेत
Raju SrivastavaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 6:23 PM

कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या प्रकृतीशी संबंधित (Health Update) मोठी बातमी समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याचं सांगण्यात येत आहे. जिममध्ये वर्कआऊट करताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका (Hearth Attack) आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, आता ताज्या अपडेटनुसार त्यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक आहे. डॉक्टरांची एक टीम राजू यांच्यावर उपचार करत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यापासून राजू हे अद्याप शुद्धीवर आले नाहीत. काही दिवसांपूर्वी त्यांना हलका ताप सुद्धा होता. त्यांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर येत आहे.

हृदयविकाराचा झटका कधी आणि कसा आला?

राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना अचानक छातीत दुखू लागल्याने ते खाली पडले. सध्या ते एम्सच्या आयसीयू वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर आहेत.

पंतप्रधान मोदींकडून मदतीचं आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

राजू यांना लहानपणापासूनच विनोदाची आवड होती. त्यांना कॉमेडियन व्हायचं होतं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून केली होती. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या या शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. मात्र, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.