Karan Johar | आलियाच्या मेंदीबद्दल करण जोहर खोटं बोलला ? ‘या’ व्यक्तीने केली पोलखोल
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रदर्शित झाल्यापासून सतत चर्चेत आहे. आता चित्रपटातील आलिया भट्टच्या हातावरील मेंदीबाबत विविध कमेंट्स येत आहेत.
Alia Bhatt Mehendi In RRKPK : करण जोहरचा (karan johar) ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur Rani ki prem kahani) हा चित्रपट लोकांना खूप आवडला असून त्याला बराच रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटातील अनेक प्रसंग लोकांना आवडले असून आलिया भट्टच्या लूकचीही खूप प्रशंसा होत आहे. त्याचदरम्यान चित्रपटात दाखवण्यात आलेल्या आलिया भट्टच्या (alia bhatt) लग्नातील मेंदीवरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.
खरंतर करण जोहर नुकतच म्हणाला होता की चित्रपटातील रील लाइफ लग्नातील आलियाची मेंदी आणि रिअल लाइफमधील लग्नाची मेंदी एकच होती. त्यावर आता चित्रपटात आलियाच्या हातावर मेहंदी काढणाऱ्या प्रसिद्ध मेंदी कलाकार वीणा नागदा यांची कमेंट समोर आली आहे. त्यानी करण जोहरचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत त्याची पोलखोल केली आहे.
आलियाची मेंदी होती सेम, करणने केले होते वक्तव्य
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटातील रील लाइफ वेडिंग सीनसाठी आलिया भट्टने हातावर मेंदी लावली होती. ज्यावर करण जोहरने एक स्टेटमेंट दिले होते की, ‘आलिया आणि रणबीर कपूरच्या (रिअल लाइफ) लग्नानंतर आम्ही हे गाणे 4 दिवसांनी शूट केले. त्यावेळी आलियाचे एकाच आठवड्यात दोनदा लग्न झाले होते. एक खऱ्या आयुष्यात आणि दुसरं रील लाईफमध्ये. चित्रपटात दाखवलेली वेडिंग मेंदी ही आलिया भट्टच्या ओरिजनल लग्नातील मेंदीच होती. पुन्हा तेच डिझाईन काढत आम्ही ती मेंदी गडद केली, असे तो म्हणाला. या गाण्याचे शूटिंग जैसलमेरमध्ये झाले होते.
View this post on Instagram
वीणा नागदा यांनी केली पोलखोल
मात्र करण जोहरच्या या वक्तव्यानंतर प्रसिद्ध मेंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांनी त्याच्यावर निशाणा साधत त्याची पोलखोल केली. करण जोहरचे नाव न घेता वीणा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना एक मोठी नोट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी खुलासा केला की, मेंदीचे डिझाईन सारखी नसून सेटवरच त्यांनी आलियाच्या हातावर मेंदी लावली होती. तिच्या लग्नाची मेंदी आणि चित्रपटाात दिसणारी मेंदी कशी वेगळी आहे, याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
फिल्मच्या सेटवर लावली मेंदी
पुढे त्यांनी असेही लिहीले की ‘ आधी काढण्यात आलेल्या डिझाइनचे श्रेय कोणीही घेत नाही. आम्ही फिल्मच्या सेटवरच मेंदी लावली होती. म्हणूनच आम्ही लोकांना विनंती करतो की कोणतीही कमेंट करण्यापूर्वी सावधगिरकी बाळगावी. चित्रपटाचे काम वेगळ्या पद्धतीने होते, तुम्ही हे समजून घ्याल अशी आशा आहे. तुम्हाला याबाबत अधिक माहिती हवी असल्यास कृपया मला मेसेज करा ‘ असेही त्यांनी लिहीले आहे.