Dilip Joshi ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून कमावतात इतके रुपये; आकडा थक्क करणारा
'तारक मेहता ता उल्टा चष्मा' मालिकेतून दिलीप जोशी कमावतात कोट्यवधी रुपयांची माया; एका एपिसोडसाठी घेतात इतकं मानधन... सध्या सर्वत्र जेठालाल यांच्या कमाईची चर्चा...
मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. टप्पूसेना यांची धम्माल मस्ती आणि गोकूळ धाम सोसायटीमधील एकतेमुळे मालीकेने चाहत्यांच्या मनात घर केलं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका तितक्याच उत्साहाने पाहतो. मालिकेतील प्रत्येक कलाकार चाहत्याचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील अनेक कलाकार सोडून गेले. पण जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी आजही चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत जेठालाल ही भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांच्या कमाईबद्दल तुम्हाला माहिती आहे. ‘ताराक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून जेठालाल कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. सध्या सर्वत्र दिलीप जोशी यांच्या कमाईबद्दल चर्चा रंगत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एका आठवड्यासाठी दिलीप जोशी तब्बल १.५ कोटी मानधन घेतात. म्हणजे महिन्याला जेठालाल मालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतात. मालिकेत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये दिलीप जोशी अव्वल स्थानी आहेत.
दिलीप जोशी यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत भूमिका साकारण्याआधी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंज केलं आहे. अभिनेता सलमान खान स्टारर ‘मैने प्यार किया’ सिनेमाच्या माध्यमातून करियरला सुरुवात केली. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेशिवाय दिलीप जोशी यांनी ‘कभी ये कभी वो’, ‘हम सब एक है’, ‘FIR’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. दिलीप जोशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दिलीप जोशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून मालिका सतत वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. जवळपास १५ वर्षांच्या मालिकेच्या प्रवासात अनेक चढ – उतार आले. अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. तर अनेकांनी निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.
पण आता मालिकेत दयाबेन येणार असल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे. मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेला चाहते प्रेम देतात.