काम करता करता शिक्षणाची सोय; ड्युएल डिग्रीची सोय! वाचा कुठे आणि कसा अर्ज करणार?
ऑनलाईन प्रवेश सुरु झालेत. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु आहेत. विशेष म्हणजे राज्यातील बंदिजनांसाठी अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ आहे.
मुंबई: आता पारंपारिक विद्यापीठाच्या पदवी सोबतच मुक्त विद्यापीठाची पदवीही घेता येणार आहे. इतकंच काय तर पदवीसोबत पदविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम देखील घेता येणारे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ऑनलाईन प्रवेश सुरु झालेत. यात पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, प्रमाणपत्र शिक्षण (सर्टिफिकेट कोर्स) इत्यादी शिक्षणक्रमांचे प्रवेश सुरु आहेत. विशेष म्हणजे राज्यातील बंदिजनांसाठी अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा. इथे तुम्हाला काम करता करता शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय या विद्यापीठात ड्युएल डिग्रीची देखील शक्य आहे. अर्ज कसा करायचा? कुठे करायचा? वाचा सविस्तर…
कुठल्या अभ्यासक्रमासाठी किती जागा?
- पदव्युत्तर पदवी – 8
- पदवी – 11
- पदविका – 39
- सर्टिफिकेट कोर्स – 25
याशिवाय मुक्त विद्यापीठात पदवीसोबत पदविका/ प्रमाणपत्र शिक्षणक्रम शिकता येणारे
प्रवेशशुल्क
- राज्यातील बंदिजनांसाठी विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी शिक्षणक्रम पूर्णतः मोफत
- अंध विद्यार्थ्यांना प्रवेशशुल्क माफ
- राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना (शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत) रू.190/- मध्ये पदवी शिक्षणक्रमास प्रवेश
संपर्क
अधिक माहितीसाठी विद्यार्थी खालील लिंक वर क्लिक करू शकतात
खालील पत्त्यावर चौकशी करू शकता
य.च.म.मु.वि. चे विभागीय कार्यालय मुंबई | द्वारा जगन्नाथ शंकरशेठ मनपा शाळा, दुसरा मजला, नाना चौक, ग्रँट रोड (प.), मुंबई 400 007.
- दूरध्वनी क्रमांक – (022) 23874180, 23874187, 23874177, 23874183
- इमेल- rd_mumbai@ycmou.digitaluniversity.ac