CUET PG 2023 Final Answer key: CUET PG 2023 परीक्षेची फायनल आन्सर की जारी, डाउनलोड कसं करणार?
cuet.nta.nic या अधिकृत वेबसाइटवरून ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. CUET PG 2023 परीक्षा 5 ते 17 जून 2023 दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा CBT पद्धतीने घेण्यात आली होती.
नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने CUET PG 2023 परीक्षेची फायनल आन्सर कि जारी केलेली आहे. उमेदवार cuet.nta.nic या अधिकृत वेबसाइटवरून ही उत्तरपत्रिका डाउनलोड करू शकतात. CUET PG 2023 परीक्षा 5 ते 17 जून 2023 दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा CBT पद्धतीने घेण्यात आली होती.
तात्पुरती उत्तरपत्रिका 13 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी उमेदवारांना 16 जुलै 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता NTA देखील लवकरच निकाल जाहीर करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
डाउनलोड कसं करणार?
- cuet.nta.nic या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- अंतिम उत्तर उत्तरकुंजीसाठी लिंकवर क्लिक करा.
- PDF तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- आता डाऊनलोड करा.
यावर्षी CUET PG परीक्षासाठी 8.76 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली. त्याचा निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तथापि, NTA ने अद्याप CUET PG 2023 च्या निकालासाठी कोणतीही तारीख आणि वेळ सांगितलेली नाहीये.
NTA ने 5 जून ते 17 जून 2023 आणि 22 जून ते 30 जून 2023 या कालावधीत भारतातील 295 आणि भारताबाहेरील 24 शहरांमध्ये कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा-पीजी 2023 चे आयोजन केले होते. अधिक माहिती आणि तपशीलांसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट किंवा NTA ने जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.