Kranti Redkar : नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना क्रांती रेडकर म्हणाल्या की, तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही खुश राहा आणि आनंदी राहा!

राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचा निर्णय जात प्रमाणपत्र छाननी समितीने दिला आहे.

Kranti Redkar : नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना क्रांती रेडकर म्हणाल्या की, तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही खुश राहा आणि आनंदी राहा!
क्रांती रेडकरImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 7:19 PM

मुंबई : एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात आज मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र (Cast Certificate) छाननी समितीकडून क्लीन चीट (Clean Cheat) मिळाली आहे. समितीच्या या निर्णयावर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी आनंद व्यक्त करीत महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबियांना टोला लगावला आहे. ”तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही खुश राहा आणि आनंदी राहा…” अशी प्रतिक्रिया क्रांती रेडकर यांनी दिली आहे. सत्याच्या लढ्यासाठी कायदेशीर पुरावा असणे अत्यंत गरजेचे आहे, जो आज आपल्याला मिळाला आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

क्रांती रेडकर यांनी सर्वप्रथम TV9 चे मानले आभार

राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचा निर्णय जात प्रमाणपत्र छाननी समितीने दिला आहे. हा निर्णय वानखेडे यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारा तर नवाब मलिक यांना मोठा झटका देणारा ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर क्रांती रेडकर यांनी आज समितीच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मलिक यांना सुनावले आहे. तसेच सर्वप्रथम त्यांनी TV9 चे आभार मानले आहेत.

सत्याच्या लढाईत बळ मिळणार

क्रांती रेडकर म्हणाल्या की, सत्याच्या लढ्यासाठी कायदेशीर पुरावा असणे अत्यंत गरजेचे असते. जो आज जात प्रमाणपत्र छाननी समितीच्या निर्णयामुळे आम्हाला मिळाला आहे. आज आम्हाला सरकारकडून न्याय मिळाला आहे. आमच्यावर मलिक व इतर मंडळींनी लावलेले सर्व खोटे आरोप खोटे ठरवणारा तसेच आम्हाला सत्याच्या लढाईत बळ देणारा महत्वाचे कागदपत्र मिळाले आहे, असेही रेडकर यांनी नमूद केले आहे. याचवेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांना टोला लगावला आहे. तुम्हाला हात जोडून शुभेच्छा, तुम्ही आनंदी राहा आणि स्थिर राहा, किती लोक कोणत्या थराला गेले होते हे मी सांगू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

आमच्यासाठी ही मोठी लढाई होती!

माझे पती समीर वानखेडे यांचा पाठलाग केला जात होता. काही जण पोलिस म्हणून आमच्या घरी येत होते तर काही जण वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आम्ही सर्वांसमोर येऊ दिल्या नाहीत. आमच्यासाठी ही मोठी लढाई होती. समीर वानखेडे यांच्या देशभक्तीवर, देशप्रेमावर कुणीच कधीच शंका घेऊ शकणार नाही. नवाब मलिक यांनी जे काही आरोप केले, ते सर्व आरोप आज जात प्रमाणपत्र छाननी समितीच्या निर्णयानंतर खोटे ठरले आहेत. कोण खोटे आणि कोण खरे हे आज जनतेसमोर सिद्ध झाले आहे, असेही क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे. (Kranti Redkars reaction after Sameer Wankhede got a clean cheat in the caste certificate case)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.