चैन्नई विमानतळावर 100 कोटी रुपयांचे 9.50 किलो कोकेन जप्त, हवाई गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर कारवाई, मुश्ताकने बुटांमध्ये लपवले होते हेरॉईन

हवाई गुप्तचर युनिटचे अधिकारी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल कुमार यांच्या माहितीवरुन इथोपियावरुन येणाऱ्या विमानातील प्रवाशांची चौकशी करण्यात आली.

चैन्नई विमानतळावर 100 कोटी रुपयांचे 9.50 किलो कोकेन जप्त, हवाई गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर कारवाई, मुश्ताकने बुटांमध्ये लपवले होते हेरॉईन
चैन्नई विमानतळावर १०० कोटी कोकेन जप्त Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 3:08 PM

चैन्नई- इथोपियातून आलेल्या एका विमान प्रवाशाकडून ( Air passenger)9.590 किलो वजनाचे कोकेन  (cocaine)आणि हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. चैन्नई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या अंमली पदार्थांची किंमत बाजारात 100 कोटी (100 Crores)रुपये सांगण्यात येत आहे. चैन्नई विमानतळाची स्थापना 1932 साली करण्यात आली होती, त्यानंतर 100 कोटी ड्रग्ज सापडण्याची ही या विमानतळावरील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येते आहे. अदिस अबाबाहून आलेल्या इक्बाल बी उरंदडी या 38 वर्षीय भारतीय प्रवाशाकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हवाई गुप्तचर युनिटचे अधिकारी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल कुमार यांच्या माहितीवरुन इथोपियावरुन येणाऱ्या विमानातील प्रवाशांची चौकशी करण्यात आली.

;

नेमकी कशी झाली कारवाई

साधारणपणे अफ्रिकेतून येणाऱ्या कोणत्यातरी व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती अधिकाऱ्यांना होती. मात्र ज्यावेळी इक्बाल या भारतीय प्रवाशाची तपासणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सीमा शुल्क अधिकाऱ्यांचा संशय त्याच्याबाबतचा बळावला. त्यानंचर त्याची सखोल चौकशी आणि तपासणी केल्यानंतर त्याच्याकडून सपमारे 100 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ११ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे चैन्नई विमानचतळावरुन काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

कुठे सापडले अमली पदार्थ

इक्बाल याच्या बॅगची तपासणी करण्यात आली, तसेत त्याच्या पायातील शूजचीही तपासणी करण्यात आली. त्यात हे साडे नऊ किलोचे कोकेन आणि हेरॉईन अधिकाऱ्यांना सापडले आहे. त्यानंतर इक्बाल याला ताब्यात घेण्यात आले असून एनडीपीएस कायद्यानुसार हा सर्व माल जप्त करण्यात आला आहे. आता मुश्ताक याच्या चौकशीत या सगळ्या अमली पदार्थांमागील मास्टरमाईंडचे नाव शोधण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे.

काही आठवड्यांपूर्वीच चैन्नई विमानतळावर सापडले होते 8.86 कोटींचे हेरॉईन

जुलैमध्ये एका टांझानियन प्रवाशाकडून 8.86 कोटी रुपयांचे हेरॉईन चैन्नई विमानतळावरच जप्त करण्यात आले होत. त्यानंतर आता ऑगस्टमध्ये ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. युगांडातून आलेल्या या प्रवाशाकडून कॅप्युल्समध्ये भरलेले हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या प्रवाशाकडून 86 कॅप्स्युल्स जप्त करण्यात आल्या होत्या. त्यात 1.26 किलोचे 8.86 कोटींचे हेरॉईन होते. जूनमध्येही चैन्नई विमानतळावर मोबाईलमध्ये लपवून स्मगलिंगसाठी आणलेले 24 लाखांचे सोने जप्त करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.