Fraud : करोडोंची फसवणूक करणाऱ्या बंटी बबलीला अटक, गुंतवणुकीच्या नावाखाली सोन्याचे दागिने लंपास
पोलिसांनी सांगितले की, बंटी आणि बबलीला 26 फेब्रुवारी रोजी दिंडोशी महामार्गावरून अटक करण्यात आली होती. प्रत्येक गुन्ह्यानंतर अटक टाळण्यासाठी ते भाड्याचे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असत. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे आतापर्यंत आठ तक्रारी आल्या असून, त्यात फसवणुकीची रक्कम कोट्यवधींची असू शकते.
मुंबई : सोन्याच्या दागिन्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा (Return) देण्याचे आमिष दाखवून शहरातील डझनभर लोकांना फसवून फरार झालेल्या बंटी आणि बबलीला मुंबईच्या बोरीवली पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. या पती-पत्नीने तक्रारदाराची 35 लाखांची फसवणूक (Fraud) केली आहे. बंटी आणि बबली या दोघांना 2015 मध्ये मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका घोटाळ्यात अटक केली होती. परंतु नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. सध्या बंटी आणि बबली दाम्पत्य तुरुंगात आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून लाखोंचे सोने आणि रोख रक्कम जप्त केली आहे. (Bunty Babli arrested by borivali police for defrauding crores)
लोकांना सोन्यात गुंतवणूक करायला लावून फसवायचे
पोलीस अधिकारी विजय माडये यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली उर्फ प्रीती जैन उर्फ पिंकी दमानिया (47) आणि तिचा पती जिग्नेश दमानिया हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे व्यापारी असल्याची बतावणी करून लोकांना सोन्याच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करायला लावत असतं. ज्याचे ते कॅरेटमध्ये रूपांतर करून बाजार भावाने विकतील. त्या बदल्यात त्याला चांगला परतावा मिळेल. पोलिसांनी सांगितले की, बंटी आणि बबलीला 26 फेब्रुवारी रोजी दिंडोशी महामार्गावरून अटक करण्यात आली होती. प्रत्येक गुन्ह्यानंतर अटक टाळण्यासाठी ते भाड्याचे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असत. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्याकडे आतापर्यंत आठ तक्रारी आल्या असून, त्यात फसवणुकीची रक्कम कोट्यवधींची असू शकते.
पुण्यात अजित पवारांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगून 10 लाख रुपयांची फसवणूक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचं सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्या एकाची 10 लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रविण विठ्ठल जगताप आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रवीण विठ्ठल जगताप यास अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी 5 कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन यांना सांगितले. त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला 10 लाख रुपये दिले, पण त्याने काही काम केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपी प्रवीण जगताप यास अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले. (Bunty Babli arrested by borivali police for defrauding crores)
इतर बातम्या
पाकिस्तानमधील मशिदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?
नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या