Mumbai Crime : इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला अटक, आरोपीकडून 35 हून अधिक गुन्ह्यांची उकल

आरोपीला अटक केल्यानंतर एमएचबी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. आरोपीने मुंबईतील विविध परिसरात 35 हून अधिक चैन स्नॅचिंग केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी कर्नाटकातून जप्त केले आहे.

Mumbai Crime : इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला अटक, आरोपीकडून 35 हून अधिक गुन्ह्यांची उकल
इराणी टोळीच्या सोनसाखळी चोराला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 2:03 AM

मुंबई : मुंबईच्या बोरिवली पश्चिम MHB पोलिसांनी इराणी टोळीच्या अशाच एका चैन स्नॅचरला अटक (Arrest) केली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र खेचून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यां (Thief)नी पोबारा केला होता. याप्रकरणी महिलेने एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीनुसार एमएचबी पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला. त्यानंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. आरोपीचा शोध घेत असताना तो कल्याणमध्ये आंबिवली येथे असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला कल्याण येथून अटक केले. कासिम मुख्तार इराणी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीला अटक केल्यानंतर एमएचबी पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. आरोपीने मुंबईतील विविध परिसरात 35 हून अधिक चैन स्नॅचिंग केले आहे. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी कर्नाटकातून जप्त केले आहे. आरोपी चोरीच्या दुचाकीवरून मुंबईतील रहिवासी भागात फिरतात आणि संधी मिळताच महिलांच्या गळ्यातील चान हिसकावून पळून जातात.

फेक पोलीस टोळीला कस्तुरबा पोलिसांकडून अटक

गरजू लोकांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावून नंतर कर्ज मंजुरीसाठी 5 लाख घेऊन पलायन करणाऱ्या टोळीतील तिघांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अजहर सईद पटेल, गणेश वेलवटकर आणि रामसिंग डोळगे अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून लुबाडलेले लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहेत. आरोपी गरजू लोकांना कर्ज देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये भेटायला बोलवायचे. मग त्यांच्याकडे कर्ज मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपये मागायचे. यावेळी फेक पोलीस बनून आरोपींचे साथीदार तेथे छापा टाकायचे आणि पैसे घेऊन पळून जायचे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. (Borivali police arrest thief of Iranian gang involved in chain snatching)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.