MP Crime : आधी महिला एसआयला गोळ्या घातल्या, मग स्वतःला संपवले; भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने खळबळ

श्यामलाहिल्स भोपाळचे स्टेशन प्रभारी हकमसिंग पवार शुक्रवारी दुपारी इंदूरच्या रिगल चौकात असलेल्या पोलिस नियंत्रण कक्षात एका महिला पोलिसाला भेटायला गेले. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. यानंतर हकम सिंह यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आधी महिला पोलिसावर गोळी झाडली, मग स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MP Crime : आधी महिला एसआयला गोळ्या घातल्या, मग स्वतःला संपवले; भोपाळमधील पोलीस अधिकाऱ्याच्या कृत्याने खळबळ
मालाडमध्ये दिराकडून वहिनीची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 12:01 AM

भोपाळ : महिला एसआयवर गोळी घालून (Firing) मग स्वतःवर गोळी झाडून भोपाळ येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना इंदूरमध्ये घडली आहे. या घटनेत महिला पोलीस जखमी (Injured) झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर महिला एसआय मध्य प्रदेशातील इंदूर येथील पोलीस नियंत्रण कक्षात तैनात होती. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षात कळताच एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी धाव घेतली. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असावी, अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दोघांमध्ये झालेल्या वादातून ही घटना घडली

श्यामलाहिल्स भोपाळचे स्टेशन प्रभारी हकमसिंग पवार शुक्रवारी दुपारी इंदूरच्या रिगल चौकात असलेल्या पोलिस नियंत्रण कक्षात एका महिला पोलिसाला भेटायला गेले. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला. यानंतर हकम सिंह यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आधी महिला पोलिसावर गोळी झाडली, मग स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनंतर एफएसएल आणि इतर पथके तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहेत. पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांनीही नियंत्रण कक्षात पोहोचून घटनेची माहिती घेतली. मृत टीआय हकम सिंग हे यापूर्वी इंदूरच्या खुदैल येथे तैनात होते. यानंतर ते खरगोनच्या महेश्वर आणि भिकनगावमध्येही टीआय झाले आहेत.

जखमी महिलेची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. तिच्याकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. भोपाळमध्ये तैनात टीआय हकमसिंग पवार यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली आहे. घटनेशी संबंधित वस्तुस्थितीची माहिती घेतली जात आहे, असे पोलीस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितले. (A police officer commits suicide by firing on a female police officer in Madhya Pradesh)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.