Mumbai Crime : मोबाईल चोरी रॅकेटमधील आणखी एका आरोपी अटक, 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

याआधी या टोळीतील 10 आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचने जेरबंद केले आहे. मुंबई शहर आणि उत्तर प्रदेशातून या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आता गुन्हे शाखेकडून टोळीच्या सूत्रधाराला अटक करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Mumbai Crime : मोबाईल चोरी रॅकेटमधील आणखी एका आरोपी अटक, 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
मोबाईल चोरी रॅकेटमधील आणखी एका आरोपी अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 7:57 PM

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीचे रॅकेट (Racket) सक्रिय आहे. मुंबईत मोबाईल चोरी (Mobile Theft) केलेले मोबाईल विकत घेऊन मग त्यांचा आयएमईआय क्रमांक बदलून ते परराज्यात विकणाऱ्या आणखी एका आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीकडून 135 चोरीचे मोबाईल आणि एक स्कूटी जप्त (Seized) करण्यात आले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 22 लाख रुपये आहे. याआधी या टोळीतील 10 आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचने जेरबंद केले आहे. मुंबई शहर आणि उत्तर प्रदेशातून या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आता गुन्हे शाखेकडून टोळीच्या सूत्रधाराला अटक करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

चोरीचे मोबाईल विकत घ्यायचे, मग आयएमईआय क्रमांक बदलून परराज्यात विकायचे

मुंबई शहरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चेंबूर येथील रहिवासी संभाजी विठ्ठल कोळेकर यांचा मोबाईल 15 जुलै रोजी चोरीला गेला होता. याबाबत त्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर चेंबूर क्राईम ब्रँचने मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास सुरु केला. तपास करत असताना पोलिस या गँगपर्यंत पोहचली. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 6 ने या टोळीतील 10 आरोपींना मुंबई शहर आणि उत्तर प्रदेशातून अटक केली. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांची कारवाई अद्याप सुरुच आहे. या दरम्यान, या टोळीतील अन्य एक सदस्य चोरीचे मोबाईल बांग्लादेश येथे विक्रीसाठी पाठवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस धाड टाकत सदर आरोपीला अटक करत त्याच्याकडील 135 मोबाईल जप्त केले. ही टोळी चोरीचे मोबाईल चोरायची मग ज्या मोबाईलचा आयएमईआय क्रॅक होत असेल, तो मोबाईलला भारतातच इतर भागांमध्ये विकत असत. (Another accused in mobile theft racket arrested, mobile worth Rs 22 lakh seized)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.