Latur Murder & Suicide : लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्या, पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन घडला प्रकार

रजनीकांतने अनेक वेळा तिला घरी परत येण्यास सांगितले. मात्र ती पतीसोबत नांदायला यायला तयार नव्हती. यावरुन रजनीकांतचे सासू आणि पत्नीसोबत सतत वाद व्हायचे.

Latur Murder & Suicide : लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्या, पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन घडला प्रकार
लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 8:20 PM

लातूर : पत्नी नांदायला येत नाही म्हणून जावयाने सासूची हत्या (Murder) करुन स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. इतकेच नाही तर आरोपीने स्वतःच्या सात वर्षाच्या मुलावरही कोयत्याने वार (Attack) केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रजनीकांत वेदपाठक (35) असे जावयाचे तर चंद्रसेना वेदपाठक (50) असे हत्या करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे. सुदैवाने पत्नी यावेळी घरी नसल्याने ती बचावली आहे.

पत्नी नांदायला येत नसल्याने सासूवर हल्ला

आरोपी रजनीकांत आणि त्याच्या पत्नीमध्ये घरगुती वाद होते. यामुळे रजनीकांतची पत्नी आपल्या सात वर्षाच्या मुलासह तिच्या माहेरी राहत होती. रजनीकांतने अनेक वेळा तिला घरी परत येण्यास सांगितले. मात्र ती पतीसोबत नांदायला यायला तयार नव्हती. यावरुन रजनीकांतचे सासू आणि पत्नीसोबत सतत वाद व्हायचे. याच वादातून संतापलेल्या रजनीकांतने सासुरवाडीत येऊन सासूवर आणि आपल्या सात वर्षाच्या मुलावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या सासूचा जागीच मृत्यू झाला. तर मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटना घडली त्यावेळी पत्नी घरी नसल्यामुळे ती बचावली आहे. सासू मयत झाल्याचे लक्षात येताच जावयाने स्वतःही जाळून घेत आत्महत्या केली. कौटुंबिक कलहाच्या या घटनेने लातुरात खळबळ उडवून दिली आहे. (A son-in-law killed his mother-in-law in a family dispute and committed suicide in Latur)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.