Kalyan : थोडक्यात मोठा अनर्थ टळला! कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीच्या तळमजल्यावरील छताचे स्लॅब कोसळला

कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील माधव संसार या इमारतीमध्ये संकुलातील त्रिपुरारी इमारतीमध्ये रूपल सिन्हा आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. काल रूपल व त्याचे आई-वडील बेडरूम मध्ये झोपले असताना पहाटे 3 च्या सुमारास त्यांच्या फ्लॅट मधील हॉलचे सिलिंग कोसळले.

Kalyan : थोडक्यात मोठा अनर्थ टळला! कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीच्या तळमजल्यावरील छताचे स्लॅब कोसळला
छत कोसळलं...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 2:10 PM

कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan News) थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीच्या तळमजल्यावरील छताचं स्लॅब कोसळला. मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घढली. तळमजल्यावरील हॉलच्या छताचा काही भाग कोसळून पडला. यात घरातील किंमती वस्तूंचं नुकसान झालं. कल्याण पश्चिमेकडील माधव संकल्प सोसायटी (Madhav Sankalp Society, Kalyan) मधील इमारतीत ही घटना घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. महत्त्वाचं म्हणजे सुदैवाने हॉलमध्ये रात्री कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र घरात राहणारे कुटुंब हॉलमध्ये असते तर मोठी दुर्घटना घडली असत या घटनेनंतर रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. कल्याण पश्चिम खडकपाडा (Kahdakpada, Kalyan West) परिसरातील माधव संसार या उच्चभ्रू संकुलातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटचे हॉल मधील सीलिंग कोसळल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.सुदैवाने घरातील मुलगा व त्याचे आई वडील बेडरूम मध्ये झोपले होते. त्यामुळं ते बचावले मात्र या दुर्घटनेत हॉल मधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जोरदार आवाज झाल्यानं घबराट

कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील माधव संसार या इमारतीमध्ये संकुलातील त्रिपुरारी इमारतीमध्ये रूपल सिन्हा आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. काल रूपल व त्याचे आई-वडील बेडरूम मध्ये झोपले असताना पहाटे 3 च्या सुमारास त्यांच्या फ्लॅट मधील हॉलचे सिलिंग कोसळले. जोरदार आवाज झाल्याने रुपल यांनी बाहेर येवून पाहिले असताना त्यांना सीलिंग कोसळल्याचे लक्षात आले. या दुर्घटनेत हॉलमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

थोडक्यात वाचले…

सुदैवाने हे तिघे बेडरूम मध्ये झोपले असल्याने त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर या हाय प्रोफाईल सोसायटीच्या सात मधली अशा नऊ इमारती असून जवळपास 375 सदनिका असलेली 14 ते 15 वर्षे जुन्या सोसायटीत गेल्या काही महिन्यापासून इमारतीचे काही भाग कोसळत असल्याने रहिवासी मध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे या सगळ्याबाबत शक्य तितक्या लवकरच खबरदारीची पावलं उचलण्याची गरज असल्याचं भावान व्यक्त करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.