Video : 2 वर्षांच्या बाळाचा मृतेदह 8 वर्षांचा भाऊ मांडीवर घेऊन रस्त्यावरच बसून राहिला! का?
Madhya Pradesh Crime : त्याचे वडील त्याला रुग्णालयात घेऊन आले. सोबत आठ वर्षांचा राजाचा छोटा भाऊ देखील होता.
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh crime News) एक आठ वर्षांचा चिमुकला आपल्या लहान भावाचा मृतदेह (Dead body) घेऊन अर्धा तास रस्त्याच्या कडेला बसून होता. दोन वर्षांच्या लहान भावाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी त्याचे वडील रुग्णवाहिका शोधत होते. तोवर या आठ वर्षांच्या बाळाने आपल्या कडेवर दोन वर्षांच्या धाकट्या भावाचा मृतदेह सांभाळला. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात घडली. रुग्णावाहिकेच्या शोधात गेलेला या मुलांचे वडील नंतर पुन्हा परतलेच नाही. शनिवारी घडलेली ही घटना आता उघडकीस आली असून याबाबतचा व्हिडीओही (Shocking Video) समोर आला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना पाहून अनेकजण हादरलेत. लहान मुलगा एका बाळाचा मृतदेह रस्त्याशेजारी घेऊन बसलाय, हे पाहून एकच गर्दी झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला याबाबत कळवण्यात आलं. याबाबत अधिक तपास केला असता, नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, तेही उघडकीस आलं.
नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशात राहणारा पुजाराम जाटव याला दोन लहान मुलं आहेत. त्यातील दोन वर्षांच्या राजा या धाकट्या मुलाला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. सुरुवातील घरीच राजावर उपचार सरु होता. पण पोटदुखी राजाला असह्य झाली. म्हणून त्याचे वडील त्याला रुग्णालयात घेऊन आले. सोबत आठ वर्षांचा राजाचा छोटा भाऊ देखील होता. त्यालाही वडील सोबत घेऊन आले होते. आठ वर्षांच्या या चिमुरड्याचं नाव गुलशन.
मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात राजावर उपचार सुरु होते. पण त्याची प्रकृती खालावली आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका मिळावी, म्हणून हतबल पित्याने अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. पण अधिकाऱ्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. अखेर हतबल पुजाराम याला रुग्णालयाची रुग्णवाहिका न मिळाल्यानं तो रुग्णालयाच्या बाहेर आला आणि रस्त्यावरच बसला.
पुजाराम हा पंक्चरचं छोटंसं दुकान चालवतो. त्याच्याकडे फार पैसेही नव्हते. अशावेळी त्यानं आपल्या दोन वर्षांच्या मेलेल्या मुलाला आठ वर्षांच्या मुलाकडे सोपवलं. त्यांना रस्त्याच्या कडेला बसवून पुजाराम घरी परतला. आठ वर्षांचा मुलगा वडिलांची प्रतीक्षा करत रस्त्याशेजारीच बसून होते. पण वडील काही परत आले नाहीते. पण आठ वर्षांच्या मुलाशेजारी जेव्हा गर्दी जमली, तेव्हा लोकांनी याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी यानंतर तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि आठ वर्षांच्या मुलाला त्यांच्या दोन वर्षांच्या मृत भावासह घरी पाठवलं.
View this post on Instagram
आईविना पोर..
दरम्यान, आजतकने दिलेल्या वृत्तानुसार पुजाराम हा अत्यंत हलाखीच्या स्थितीत राहत होता. या दोन्हीही मुलांना आई नाही. दोन वर्षांच्या बाळाचं पोट बिघडल्यानंतर डॉक्टरांनी या मुलाला इनो आणि हिंग द्यायला सांगितलं होतं. पण त्यानंतरही या मुलाची प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. अखेर तो मुलाला घेऊन रुग्णालयात गेला. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या मृत्यूनंतरही झालेली फरफट काळीज पिळवटून टाकणारी होती. या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.