अग्निवीरांसाठी उद्योजकांच्या पायघड्या ! महिंद्रा यांच्या नंतर टाटा सन्स ही नोकरी देण्यासाठी पुढे सरसावली

अग्निवीरांसाठी महत्वाची बातमी आहे, त्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता पाहता, अनेक उद्योजकांनी अग्निवीरांसाठी दरवाजे उघडले आहेत. अशा कुशल मनुष्यबळाला नोकरी देण्याची तयारी महिंद्रा ग्रुपनंतर अनेक उद्योगपतींनी सुरु केली आहे.

अग्निवीरांसाठी उद्योजकांच्या पायघड्या ! महिंद्रा यांच्या नंतर टाटा सन्स ही नोकरी देण्यासाठी पुढे सरसावली
टाटा सन्सकडून अग्निवीरांसाठी पायघड्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:06 PM

अग्निपथ योजनेविरोधात (Agnipath Scheme) उत्तर भारतातील अनेक भागात कडकडीत बंद जरी पाळण्यात आला असला आणि हिंसक प्रदर्शने जरी झाली असली तरी या योजनेची सकारात्मक बाजू ही समोर येत आहे. या योजनेला अनेक बड्या उद्योजकांनी (Industrialist) पाठिंबा दर्शविला आहे. केवळ समर्थन देऊनच उद्योग समुह थांबले नाहीतर या कुशल मनुष्यबळाचा त्यांच्या कंपन्यांना फायदा पोहचावा यासाठी त्यांनी ही योजना अंमलात येण्यापूर्वीच अशा अग्निवीरांना नोकरी देण्याच्या ऑफर्सचा (Job Offers) धडाका लावला आहे. महिंद्रा ग्रुपनंतर (Mahindra Group) आता टाटा सन्स कंपनीने (Tata Sons) आणि इतर बड्या उद्योग समुहांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या उद्योजकांनी अग्निपथ योजनेचे तोंडभरून कौतुकही केले आहे. अग्निपथ योजनेतंर्गत तिनही सैन्य दलात भरती प्रक्रिया येत्या दोन दिवसांत सुरु होत आहे. त्यामुळे ही योजना सुरु होण्यापूर्वीच अग्निवीरांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

रोजगाराच्या अमर्याद संधी

आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर या योजनेविषयी आणि हिंसक घटनांविषयी भावनांना वाट मोकळी करुन दिली. अग्निपथ योजनेवरुन देशात सुरु असलेल्या हिंसेवरुन दुःखी झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे तरुणांना स्वंयशिस्त लागेल आणि त्यांच्यात क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्याकडे चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर कौशल्य ही असेल, या गोष्टी त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महत्वाच्या ठरतील असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिंद्रा समुह अशा प्रशिक्षित आणि क्षमताप्राप्त तरुणांना रोजगार देण्यासाठी तयार असून अशा अग्निवीरांचे समुहात स्वागत असल्याचे ट्विट महिंद्रा यांनी केले.आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत, कॉर्पोरेट क्षेत्रात अग्निवीरांना रोजगाराच्या अनंत आणि अमर्याद संधी असल्याचा विश्वास दिला.

हे सुद्धा वाचा

अग्निवीरांना टाटा सन्समध्ये नोकरी

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी अग्निपथ योजनेलाही पाठिंबा दिला आहे. अग्निपथ ही तरुणांसाठी देशाच्या संरक्षण दलात सेवा बजावण्याची उत्तम संधी असून अशा तरुणांचे टाटा समुहात स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले.

भरती प्रक्रियेसाठी तारखांची घोषणा

सैन्य दलात भरतीसाठी तीनही सैन्य दलांनी भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीची तारीखही घोषीत करण्यात आली आहे. आर्मीसाठी 1जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. तर वायुसेनेसाठी भरती प्रक्रिया 24 जूनपासून सुरु करण्यात येईल.नाविक दलासाठी भरती प्रक्रिया 25 जूनपासून सुरु होत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.